एक्स्प्लोर
नवी मुंबईत तब्बल 45 लाखांच्या नव्या नोटा जप्त
नवी मुंबई: नव्या नोटा सापडण्याचं सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. आज नवी मुंबईतल्या खारघरमध्ये 45 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. खारघर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
खारघरमधील प्रथमेश अपार्टमेंट 12 टक्के कमिशनवर जुन्या नोटा बदलून दिल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आपला माणूस पाठवून ही कारवाई केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये जयदास तेलवणे, सुरेश पाठक, ईक्बाल पटेल, महेश पटेल, जुबेर पटेल यांचा समावेश आहे. जप्त केलेल्या नोटांबद्दल पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement