Coronavirus | ठाण्यात 7 दिवसात 167 नवीन रुग्णांची भर; अनेक प्रभाग पूर्णपणे सील
ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यात आज 28 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आता 372 इतकी झाली आहे.
ठाणे : शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस दोन अंकी आकड्याने वाढत जात असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी 34 रुग्ण ठाणे शहरात आढळले होते, तर आज आणखीन 28 रुग्णांची त्यात भर पडली. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आता कोरोना रुग्णांची संख्या ही तब्बल 372 इतकी झाली आहे. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण हे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातच आहेत.
सुरुवातीला अतिशय कमी रुग्णसंख्या ठाण्यात होती. मात्र, हळूहळू हा आकडा वाढत गेला. आज त्यात 28 नवीन रुग्णांची भर पडली. काल देखील 34 रुग्ण आढळून आले होते. आज 13 रुग्ण लोकमान्य नगर-सावरकर नगर भागात, वागळे विभागात 7 रुग्ण, वर्तकनगर इथे 3 रुग्ण, मुंब्रा विभागात 1 रुग्ण, राबोडी उथळसर इथे 1 रुग्ण, पाचपाखडी इथे 1 रुग्ण, नौपाडा इथे 1 रुग्ण तर हरिनिवास सर्कल इथे 1 रुग्ण आढळला आहे. अनेक उपाययोजना करूनही हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक प्रभाग समिती मधील रुग्ण आढळले प्रभाग, पूर्णपणे सील करण्यात येत आहेत. फक्त मागील सात दिवसात दीडशेहून जास्त (167 ) रुग्ण हे ठाणे महापालिका क्षेत्रात आढळले आहेत.
Lockdown 3 | राज्यात लॉकडाऊनमध्ये झोननिहाय शिथिलता; काय सुरु होणार? काय बंद राहणार?
ठाण्यातील एकूण रुग्णांचा आकडा हा काल 344 होता. तर आज हाच आकडा 372 वर पोहोचला आहे. सध्या 283 रुग्ण हे उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 15 जणांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे. तसेच 74 जण हे कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण हे मुंब्रा भागात होते. मात्र, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रात आता सर्वाधिक रुग्ण झाले आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्णसंख्या ही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आहे. जिथे सर्वात उशिरा रुग्ण सापडला होता. मात्र, आज बाकी महानगरपालिकांनी स्थिती नियंत्रणात आणली असली तरी ठाण्यात अजूनही स्थिती नियंत्रणात नाही.
Corona Update | राज्यात आज 790 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, आतापर्यंत 2000 रुग्णांना डिस्चार्ज
प्रभाग समितीनुसार आकडेवारी
माजीवडा मानपाडा प्रभाग समिती - 23 वर्तक नगर प्रभाग समिती - 30 लोकमान्य नगर - सावरकर नगर प्रभाग समिती - 78 नौपाडा - कोपरी प्रभाग समिती - 43 उथळसर प्रभाग समिती - 36 वागळे प्रभाग समिती -65 कळवा प्रभाग समिती - 33 मुंब्रा प्रभाग समिती - 55 दिवा प्रभाग समिती - 9
या आठवड्यातील रुग्णांची वाढ रविवार 17 सोमवार 15 मंगळवार 15 बुधवार 23 गुरुवार 31 शुक्रवार 34 शनिवार 28
Corona Ground Report | कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट