एक्स्प्लोर
Advertisement
तांत्रिक बिघाडामुळे बंद असलेली 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
मुंबई: 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झाली असून प्रवेशाचं संकेतस्थळ सध्या व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय फॉर्म भरता येत आहे. 3 दिवसांपूर्वी हे संकेतस्थळ सुरु झालं होतं, मात्र ते काही वेळातच यामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळं प्रवेश प्रक्रिया रखडली होती. मात्र तांत्रिक सुधारणा केल्यानंतर आता हे पुन्हा सुरु झालं आहे.
दरम्यान, कलागुणांच्या वाढीव मार्कांमुळे प्रवेश प्रक्रियेबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कलागुणांसाठी दाखवण्यात आलेले मार्क्स 11 वीच्या फॉर्ममध्ये नेमके कुठे भरायचे याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
यावर्षी पहिल्यांदाच कलागुणांसाठी वाढीव मार्क्स देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी 2 टक्के राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. तसंच काही विद्यार्थ्यांचे कलागुणांचे मार्क्स गुणपत्रिकेवर अजूनही नमूद झालेले नाहीत. त्यामुळेही मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement