Mumbai City District : मतदार यादीत छायाचित्र आवश्यक,अन्यथा नावं वगळणार : जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मतदाराने 8 जुलैपूर्वी आपले छायाचित्र जमा न केल्यास संबंधित मतदाराने स्थलांतर केलं आहे अथवा तो त्या मतदार संघात रहात नाही असं गृहीत धरण्यात येऊन त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबई जिल्ह्यातील ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदार संघात जाऊन आपले छायाचित्र 8 जुलैपूर्वी जमा करावीत अन्यथा त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येतील,असं आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केलं आहे. मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेल्या एक लाख 18 हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
भारतीय निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये मतदारांची छायचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यांत मतदार यादी नुतनीकरणाचा कार्यक्रम सुरु आहे. दोषरहित व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदार संघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत मतदार यादीतील छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदार संघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत.
छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदार संघाच्या कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.electionmumbaicity.org.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
प्रशासनाने दिलेल्या वेळेत मतदारांनी छायाचित्र जमा न केल्यास संबंधित मतदाराने स्थलांतर केलं आहे अथवा तो त्या मतदार संघात रहात नाही असं गृहीत धरण्यात येऊन त्याचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल. याविषयी काही शंका असल्यास किंवा या संदर्भात काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधीत जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Delhi : खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात, फी महिन्याला भरण्याची मुभा; दिल्ली सरकारचा निर्णय
- Petrol-Diesel Price Today, 02 July 2021: पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; मुंबईत पेट्रोल 105 पार, इतर शहरात काय स्थिती?
- Virushka : 'तेरा लाल दुपट्टा मलमल का', जेव्हा विराट कोहलीने सर्वांच्या समोर ओढला अनुष्काचा दुपट्टा...























