एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price Today, 02 July 2021: पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरुच; मुंबईत पेट्रोल 105 पार, इतर शहरात काय स्थिती?

Petrol-Diesel Price Today कोरोना कालावधीत पेट्रोलियम उत्पादनांवरील कस्टम आणि अबकारी शुल्कातून मिळणारी केंद्रसरकराची कमाई 56 टक्क्यांहून अधिक वाढली असल्याची बाब आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली : दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईमुळे सामान्य माणसांच्या खिशाला कात्री लागत आहे. सतत वाढत्या तेलाच्या किंमतींपासून जनतेला दिलासा मिळालेला नाही. आज पुन्हा एकदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 35 पैशांनी महागले आहे.

वाढलेल्या दरांसह आज दिल्लीत पेट्रोल 99.16 रुपये प्रति लिटर झालं आहे. तर डिझेलच्या किंमतीती कोणतीही वाढ झालेली नाही. दिल्लीत डिझेल 89.18 रुपये प्रति लिटर विकण्यात येत आहे.

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किंमती

मुंबईत आज पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 96.30 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये आज पेट्रोल 98.99 रुपये आणि डीझेल 92.03 रुपये प्रति लिटर

चेन्नईत आज पेट्रोल 100.15 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लीटर

नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 99.16 रुपये आणि डिझेल 89.18 रुपये प्रति लिटर

पेट्रोलियम उत्पादनांवरील करांतून केंद्र सरकारची भरघोस कमाई

आरटीआयच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली आहे की, कोरोना कालावधीत पेट्रोलियम उत्पादनांवरील कस्टम आणि अबकारी शुल्कातून मिळणारी केंद्रसरकराची कमाई 56 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. अप्रत्यक्ष करातून सुमारे 2.88 लाख कोटी रुपये सरकारने मिळाले आहेत.

2020-21 मध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर 37 हजार 806 कोटी रुपयांची कस्टम ड्युटी वसूल केली गेली. तर सेंट्रल एक्साईज ड्यूटीमधून 4.13 लाख कोटी सरकारला मिळाले. तर पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीत कस्टम ड्युटी म्हणून 46 हजार कोटी वसूल करण्यात आले.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात तक्रार

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेट्रोलियम उत्पादक देशांमध्ये कच्च्या तेलाची कमी किंमत असूनही एका षडयंत्रांतर्गत पेट्रोल आणि डिझेल जास्त किंमतीला विकल्या गेल्याचा आरोप स्थानिक रहिवासी आणि तक्रारदार तमन्ना हाशमी यांनी केला आहे.

देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Lok Sabha Election Bhandara :  भंडाऱ्यात नाना पटोले विरूद्ध प्रफुल्ल पटेल यांच प्रतिष्ठा पणालाLoksabha Election 2024 Chandrapur : चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांचा उत्साहRamtek Loksabha election 2024:जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचं राजू पारवेंनी जनतेला केलं आवाहनBharat Gogawale On Sunil Tatkare:तटकरेंच्या खासदारकीची गॅरंटी आमची, त्यांनी विधानसभेची गॅरंटी घ्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
कुठं उष्णतेची लाट तर कुठं अवकाळीचा तडाखा, कसं असेल देशातील हवामान? सविस्तर माहिती एका क्लिकवर
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
'कुर्ल्यात रातोरात पाडलेले गाळे, तितक्याच वेगानं पुन्हा बांधून द्या', बीएमसीच्या मनमानी कारवाईवर संतप्त झालेल्या हायकोर्टाचे खडे बोल
Mumbai Indians Rohit Sharma Hardik Pandya: शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : चैत्री कामदा एकादशी निमित्त सुमारे दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल
Maharashtra News LIVE Updates : चैत्री कामदा एकादशी निमित्त सुमारे दोन लाख भाविक पंढरपूर मध्ये दाखल
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Embed widget