Manoj Jarange: कृष्णा आंधळेला धनंजय मुंडेंनीच लपवलं; मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case: मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी खळबळजनक दावा केला आहे.

Manoj Jarange On Santosh Deshmukh Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी कृष्णा आंधळे (Krushna Andhale) अद्यापही फरार आहे. याचदरम्यान मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarang Patil) यांनी आज (3 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.
कृष्णा आंधळे एक नाही अनेक आहेत. खंडणी घेऊन पैसे जमावण्यासाठी मजा वाटली. कृष्णा आंधळे कुठेही जाणार नाही. त्याला धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीच लपवून ठेवलं आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. कृष्णा आंधळेला तपास यंत्रणा बरोबर शोधून काढले आणि नाही शोधलं तर गंभीर परिणामांना सामोरे जावं लागेल, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.
कृष्णा आंधळेने जर काही पुरावे नष्ट केले, तर...-
संतोष देशमुख यांच्या हत्येला 55 दिवस झाले आहेत. तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप देखील फरार आहे. कृष्णा आंधळेने जर काही पुरावे नष्ट केले, तर याची जबाबदारी प्रशासनाची राहील अशी प्रतिक्रिया सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिले आहे. तर दुसरीकडे विष्णू चाटे याचा मोबाईल देखील अद्याप सापडलेला नाही. त्यामध्ये देखील पुरावे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, अशी विनंती धनंजय देशमुखांनी केली. तर उद्या याच प्रकरणावर अंजली दमानिया पत्रकार परिषद घेणार आहेत आणि काही पुरावे सादर करणार आहेत, त्यावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की सर्व काही राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आम्हाला न्याय देण्याच्या बाजूने आहेत आणि ते आमच्या बाजूने लढत आहेत, याची देखील सरकारने दखल घ्यावी, असं धनंजय देशमुखांनी सांगितले.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराड निवडणुकीआधी भेटायला आले होते- मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट
धनंजय मुंडे निवडणूकपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसांपासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. आणि मला सांभाळा असे म्हटलं. मी झोपलो होतो ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असं त्यांना म्हटलं होतं. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जाताना पाया पडले, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. याच्या एका नेत्याने जिवंतपणी मरण-यातना भोगल्या या टोळीमुळे, असा दावाही मनोज जरांगे यांनी यावेळी केला.
























