एक्स्प्लोर
सहस्त्रकुंड धबधब्यात पडून तरूणाचा मृत्यू
नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यात तोल कोसळून पडल्यामुळं एका तरूणाचा मृत्यू झाला आहे.
नांदेड : नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यात तोल कोसळून पडल्यामुळं एका तरूणाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची दृश्य धबधब्यावर फिरायला आलेल्या पर्यटकाच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाली आहेत.
सहस्रकुंड धबधबा हा नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यच्या सीमेवर आहे. सध्या धबधबा सुरू आहे त्यामुळे अनेक पर्यटक इथे धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतात, काल सायंकाळी असाच एक तरुण धबधबा परिसरात आला होता.
हा तरुण पर्यटकांसाठी असलेल्या जागेवर न थांबता थेट धबधब्याच्या पाण्याजवळ गेला. पाण्याच्या प्रवाहाचा दबाव जास्त असल्याने त्याचा तोल जाऊन पाण्याच्या प्रवाहाबरोबर पडला, यावेळी इतर पर्यटकांकडून ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली.
दरम्यान, अंधार पडल्यामुळं पोलिसांनी आज सकाळी शोधकार्य सुरू केलं. स्थानिकांच्या मदतीनं तरूणाचा मृतदेह सापडला असला तरी त्याची ओळख पटलेली नाही.
पावसाळ्यात सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतो. धबधब्याच्या ठिकाणी धोक्याच्या सुचना देणारे फलक लावलेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अनेक तरूण जीवघेणं धाडस दाखवतात.
घटनेचा व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement