एक्स्प्लोर

भविष्यात UPI वापरासाठी पैसे मोजावे लागणार? आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रांचं सूचक वक्तव्य, म्हणाले कोणाला तरी खर्च करावा लागेल...

UPI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी UPI हा शाश्वत प्लॅटफॉर्म होण्याची गरज असल्याचं म्हटलं. भविष्यात कोणाला तरी खर्च उचलावा लागेल, असं ही ते म्हणाले.

मुंबई : सध्या UPI चा वापर मोफत असला तरी येत्या काळात त्याच्या वापरासंदर्भातील नियम बदलले जाऊ शकतात यूपीआयच्या वापरासाठी शुल्क द्यायला लागू शकतं, अशी शक्यता आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांनी याबाबत सूचक इशारा दिला आहे. ते म्हणाले की मोफत डिजिटल व्यवहार बंद केले जाऊ शकतात. म्हलोत्रा पुढं म्हणाले की यूपीआय सातत्यानं नवे विक्रम करत आहे. मात्र, याला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि शाश्वत बनवण्याची गरज आहे. कोणाला तरी याचा खर्च करावा लागेल, असंही ते म्हणाले. 

फायनान्शिअल एक्स्प्रेस सोबत बोलताना संजय म्हलोत्रा म्हणाले की यूपीआय वापरासाठी कोणतंही वापरकर्ता शुल्क आकारलं जात नाही. या यंत्रणेला पूर्णपणे फ्री ठेवण्यासाठी सरकारकडून बँक आणि इतरांना सब्सिडी दिली जात आहे. ते म्हणाले की पेमेंट आणि पैसा सध्या काळाची लाइफलाइन आहे. आपल्याला एका कुशल आणि मजबूत यंत्रणेची रज आहे. सरकारकडून बँक आणि यूपीआयशी संबंधत अन्य संस्थांना सब्सिडी दिली जात आहे. ज्यामुळं यूपीआय यंत्रणा पूर्णपणे मोफत ठेवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र, यच्या वापरासाठी काही खर्च तर करावा लागेल. संजय म्हलोत्रा म्हणाले पैसे तर द्यावे लागतील, कुणाला तरी खर्च करावाच लागेल. 

आरबीआयचे गव्हर्नर संजय म्हलोत्रा यांचं वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा यूपीआय पेमेंटमध्ये वेगानं वाढ होत आहे. दररोज होणारे व्यवहार गेल्या दोन वर्षात दुप्पट झाले आहेत. एका दिवसात आता 60 कोटी व्यवहार यूपीआयवरुन होतात. संजय म्हलोत्रा म्हणाले की झिरो एमडीआरचं धोरण सुरु ठेवण्याबाबत अखेर निर्णय सरकारला घ्यायचा आहे. 

संजय म्हलोत्रा म्हणाले की कोणतीही सेवा खऱ्या अर्थानं शाश्वत असावी. त्याचा खर्च सामुदायिक पणे किंवा वापरकर्त्यानं केला पाहिजे. 

दरम्यान, केंद्र सरकारच्या झिरो एमडीआर धोरणामुळं यूपीआय व्यवहारांमधून सरकारला उत्पन्न मिळत नाही. एमडीआर म्हणजेच मर्चंट डिस्काऊंट रेट हे शुल्क बँकांकडून मर्चंटसाठी डिजीटल प्रेमेंट प्रोसेस करण्यासाठी आकारलं जातं. हे साधारणपणे 1 ते 3 टक्के असतं. केंद्र सरकारनं डिसेंबर 2019 मध्ये रुपे डेबिट कार्ड आणि भीम यूपीआय व्यवहारांसाठी झिरो एमडीआर धोरण आणलं होतं.

जलद पेमेंटस प्रक्रियेत यूपीआयनं जागतिक पातळीवर व्हिसाला मागं टाकलं आहे. जून महिन्यात 18.39 अब्ज व्यवहारांद्वारे 24.03 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. भारतातील डिजीटल पेमेंट पैकी 85 टक्के पेमेंटस यूपीआयद्वारे केले जातात.  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Student Protest: आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
आता आणखी एका देशाच्या राजधानीत विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं, पीएमओ, सरकारी इमारती अन् बँकांना आग लावली; जगाच्या पाठीवर भारत, फ्रान्स, जर्मनीसह 11 देशातील विद्यार्थ्यांचा रस्त्यावर आक्रोश
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Embed widget