एक्स्प्लोर

Shiv sena - BJP : ठाकरे गटाकडून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न होतोय का? 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औपचारिक गप्पांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आली अलल्याचे म्हटले. एवढ्यावरच न थांबता ही कटुता संपवली पाहिजे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

मुंबई : ठाकरे गट (shiv sena uddhav balasaheb thackeray) भाजपशी (BJP) जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. त्याचं कारण म्हणजे आज सामनामधील (saamana) आग्रलेखातून ठाकरे गटाकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कटुता संपवण्यासाठी आवाहन करण्यात आलं. सामनाच्या या अग्रलेखामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील गट भाजपसोबत युती करू इच्छित आहे का? दोन्ही पक्ष आपापसातील वैर संपवू इच्छित आहेत का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेची अचानक नरमलेली भूमिका भाजपसाठी धक्कादायक आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल औपचारिक गप्पांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आली अलल्याचे म्हटले. एवढ्यावरच न थांबता ही कटुता संपवली पाहिजे अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर आज दैनिक सामनामध्ये कटुता संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीस यांनी उचलावाच असे आवाहन करण्यात आले. त्यानंतर राजयकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाल्या की, दोन्ही पक्ष आपापसातील वैर संपवू इच्छित आहेत का? 

सामनाच्या अग्रलेखाचा मसुदा कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तयार केला होता. राऊत काही महिन्यांपूर्वी तुरुंगात गेल्यानंतर संपादकीय कोण लिहिते हे आता गूढ आहे. असे असले तरी सामनाच्या संपादकीयमध्ये छापलेली कोणतीही गोष्ट उद्धव यांच्या मते मानली जाते. कारण उद्धव ठाकेर सामनाचे मुख्य संपादक आहेत. 

भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न काल देवेंद्र फडवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, “इतकी कटुता आहे, मला असे काही लवकर होईल असे दिसत नाही. जे काही घडले त्यामुळे मन दुखावले गेले.” देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या वक्तव्याला आज सामनातून उत्तर देत ही कटुता संपण्याचं आवाहन करण्यात आलं.  “महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ कटुताच नाही तर सूडाचे विषही वाहत आहे. महाराष्ट्रातील एकात्मतेची परंपरा कायम राहिली पाहिजे, या फडणवीस यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!” असे आवाहन सामतातून करण्यात आले आहे. 

2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या दिवाळी मिलन कार्यक्रमात शिवसेना आणि भाजपमधील कटुता समोर आली होती. देवेंद्र फडवीस त्यावेळी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी पत्रकारांना त्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले होते. विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले होते आणि नवे सरकार स्थापनेवरून शिवसेना आणि भाजपची युती तुटण्याच्या मार्गवर होती. भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दोन्ही पक्षांनी घेण्याचे शिवसेनेला आश्वासन दिले होते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. मात्र, पत्रकारांसोबत औपचारिक गप्पा मारताना फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावत उद्धव ठाकरे खोटे बोलत असल्याचे म्हटले होते. ही बातमी लगेचच अनेक माध्यमांमध्ये प्रसारीत झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या उद्धव यांनी भाजपसोबतची युती तोडली आणि राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची कधीच समोरा-समोर भेट झाली नाही. शिवाय दोघांनीही अनेक वेळा एका मंचावर येणे टाळले.  

जून महिन्यात शिवसेनेतील बंडखोरीचा उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. उद्धव ठाकरे यांना फक्त मुख्यमंत्रीपदावरूनच बाजूला करण्यात आले नाही तर  त्यांचे अनेक आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारीही त्यांना सोडून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा हात होता हे उघड गुपित आहे. त्यामुळे पुढील नुकसान टाळण्यासाठी आणि पक्षाच्या नुर्नबांधणीसाठी ही कटुता कोठेतरी थांबली पाहिजे असे उद्धव ठाकरे यांना वाटत असेल का असे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाकरे गटाचे आवाहन, कटुता संपवण्यासाठी... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget