एक्स्प्लोर
Advertisement
महाड दुर्घटना: सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?
रायगड/मुंबई : रायगड जिल्ह्यात घडलेल्या भीषण दुर्घटनेला अनेक तास उलटले आहेत. मात्र, अद्यापही या दुर्घटनेत बेपत्ता झालेले 22 प्रवासी आणि वाहनांचा शोध लागलेला नाही. एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्डसह अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून बचावकार्य वेगानं सुरु आहे.
सावित्री नदीत दूरपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जात आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.
सावित्री नदीवर नेमकं काय घडलं?
रायगडमधल्या सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक ब्रिटीशकालीन पूल काल रात्री साडेअकराच्या सुमारास वाहून गेला. या दुर्घटनेत पुलावरुन जाणाऱ्या २ एसटी बसेससह ७ ते ८ वाहनंही वाहून गेली.
त्यामुळे या दुर्घटनेत २० ते २५ जण बेपत्ता झाल्याची भीती वर्तवली जात आहे. वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बसेसचा समावेश आहे.
महाड आणि पोलादपूर या दोन शहरांना जोडणारा हा ब्रिटीशकालीन पूल होता.
साधारणपणे १०० वर्षापासून या पुलावरुन वाहतूक सुरु होती. कोकणहून मुंबईकडे येणारी वाहनं या पुलावरुन जायची. मात्र, पुलाची दुरावस्था आणि गेल्या ३ दिवसांपासून कोकणात सुरु असणारा पाऊस यामुळे हा पूल मध्यरात्री वाहून गेला.
बचावकार्य वेगात
सध्या एनडीआरएफ, नौदल, कोस्टगार्डसह अग्निशमन विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून बचावकार्य सुरु आहे. नदीत दूरवपर्यंत बेपत्ता वाहनं आणि लोकांचा शोध घेतला जात आहे. मात्र, या दुर्घटनेत नेमकी किती जीवितहानी झाली, याची माहिती मिळू शकलेली नाही.
*एनडीआरएफची चार पथकं महाडमध्ये बचावकार्य करणार आहे. यातील प्रत्येक पथकात 40 जणांचा समावेश आहे.
*याशिवाय नौदल आणि तटरक्षकदलाची हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल झाली आहेत.
*एनडीआरएफच्या 6 बोटी बचावकार्य करत आहेत.
*रेल्वेकडून तातडीने मदत, रेल्वेच्या डॉक्टर आणि बचाव दल घटनास्थळी
पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली
सावित्री नदीवरच्या दुर्घटनेने मुंबई-गोवा महामार्ग विस्कळीत झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. छोटी वाहनं माणगाव, बिरवाडे आणि दादली या 3 पर्यायी मार्गांनी वळवली आहेत.
संपर्कासाठी नंबर
राजापूर-बोरिवली, जयगड-मुंबई एसटी बसमधील प्रवाशांच्या नातेवाईकांनी 02141-222118 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा 1077 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री आणि पंतप्रधानांचं महाडकडे लक्ष
दरम्यान, महाड दुर्घटनेत शक्य ती सर्व मदत करण्याचं आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: या घटनेकडे लक्ष ठेवून असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
बघ्यांची गर्दी
दरम्यान, ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली., त्या पुलावर बघ्यांनी मोठी गर्दी केलीय...त्यामुळे पोलिसांची अर्धी कुमक या लोकांना हटवण्यातच खर्च होतेय.. बचावकार्य सुरु असताना लोकांनी गर्दी कमी करुन बचावयंत्रणांना सहकार्य करावं, असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं.
विधानसभेत पडसाद
महाड दुर्घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. या दुर्घटनेबाबत मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटलांवर ३०२ अंतर्गत खटला का चालवू नये, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. तर या संपूर्ण दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
दुर्घटनाग्रस्त पुलाची गेल्या मे महिन्यातच पाहणी झाली होती. त्यावेळी पूल सुस्थितीत असल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं., असं निवेदन या दुर्घटनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी दिलं. त्यावर मे महिन्यात पाहणी करुन अवघ्या २ महिन्यातच पूल कसा कोसळतो., असा सवाल विरोधकांनी केला.
सर्व पुलांचं ऑडिट करणार
या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील सर्व पुलांचं ऑडिट करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर एकूण 36 लहान-मोठे ब्रिटीश कालीन पूल आहेत. ज्यांचं येत्या १५ दिवसात ऑडिट करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
संबंधित बातम्या
LIVE : महाड पूल दुर्घटना : दोन एसटी बसमधील 22 जण बुडाल्याची भीती
महाड दुर्घटना : चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा नोंदवा : अजित पवार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement