सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांचा मोठा दणका! एकाचवेळी 9 गुंडांना दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून केलं तडीपार
पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. एकाचवेळी शहरातील 9 गुंड पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत.
Pune Crime News : पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. स्वतःला दादा समजत शहरात दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुंडांना पुणे पोलिसांनी तडीपार केलं आहे. एकाचवेळी शहरातील 9 गुंड पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहेत. शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्ड आणि शहरातील इतर परिसरात दहशत माजवणाऱ्या 9 गुंडाना दोन वर्षांसाठी शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करत, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक पावले उचलायला सुरुवात
शहरात वाढती गुन्हेगारी आणि टोळीयुद्धाचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. तडीपार करण्यात आलेल्या या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर गुन्हेगारी टोळ्या, तसेच सराइतांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याने नऊ जणांना तडीपार करण्यात आले. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे
जालिंदर मसा मोरे (वय 48 रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा ऊर्फ गणराज सुनिल ठाकर (वय 26 रा. अप्पर बिबवेवाडी), ओंकार लक्ष्मण सणस (वय 23 रा. बिबवेवाडी), राजु महादेव डेंगळे (वय 22 रा. सुखसागर नगर), आकाश गुलाबराव कांबळे (वय 21 रा.), कृष्णा बबन लोखंडे (वय 24 रा.), आर्यन बापु बेलदरे (वय 24 रा. आंबेगाव बुद्रुक), सोमगौडा गुरन्ना चौधरी (वय ३३, रा. मार्केटयार्ड), साहिल भिमा अष्टगे (वय 20 रा. मार्केटयार्ड) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, सध्या राज्याच्या काही भागात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशा घटना घडून नयेत म्हणून पोलीस प्रशासन सतर्क आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात पुणे जिल्ह्यात देखील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. या गुन्हेगारीच्या मुद्याची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुणे शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रशासन सतर्क झालं आहे. सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pune News: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आढळला बेपत्ता मजुराचा मृतदेह, मध्यरात्री अचानक गायब, फोनही बंद अन्...; नेमकं काय घडलं?

























