एक्स्प्लोर

विमान प्रवासात शरद पवार म्हणाले, राजला इथे बसू द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भेटीनंतर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. शरद पवार आणि राज ठाकरे औरंगाबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये होते. दोघांच्या रूम वेगवेगळ्या होत्या. परत येताना विमानप्रवासामध्येही दोघे एकत्रित दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता.

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भेटीनंतर वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. शरद पवार आणि राज ठाकरे औरंगाबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये होते. दोघांच्या रूम वेगवेगळ्या होत्या. परत येताना विमानप्रवासामध्येही दोघे एकत्रित दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला होता. शरद पवार आणि राज ठाकरे यांचे विमानप्रवासातील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यावर मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील झाली. विमानामध्ये पवार यांच्या शेजारी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची सीट होती तर राज ठाकरे यांची सीट दुसऱ्या बाजूला होती. मात्र शरद पवार यांनी खोतकर यांना "तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.", असे सांगत राज यांना जवळ बसवून चर्चा केली. त्या दिवशी विमानात नेमके काय घडले? याविषयी कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सविस्तर माहिती दिली आहे. कीर्तिकुमार शिंदे यांची फेसबुक पोस्ट दोन मोठे राजकीय नेते जेव्हा प्रत्यक्ष भेटतात, तेव्हा छोट्यांनी तिथं घुटमळत उभं राहू नये, आणि तरीही, त्यांच्यात झालेला संवाद कानावर पडलाच तर त्याची जाहीर वाच्यता करू नये, असे संकेत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विमानप्रवासातील भेटीबाबत ज्या चर्चा वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियात काल सायंकाळपासून सुरू आहेत, त्या पाहता हा संकेत मोडणं गरजेचं वाटतंय. औरंगाबाद-मुंबई विमानप्रवासातील "पवार-ठाकरे भेट ठरवून घडवण्यात आली" इथपासून ते "आता एनसीपी आणि मनसे एकत्र येणारच" इथपर्यंत आणि "राज हे पवारांची प्रत्येक गोष्ट ऐकतात" इथपासून ते "मनसेला आमच्या महाआघाडीत स्थान नाही" या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या मतापर्यंत प्रत्येक गोष्टीवर गेल्या काही तासात अक्षरश: महाचर्चा झडल्या आहेत. भाजपच्या ट्रोल आर्मीने आणि शिवसेनेच्या ऑनलाईन वीरांनी नेहमीप्रमाणे या भेटीची थट्टा उडवत राज यांच्यावर टीका केली आहे. पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे. औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण करण्यासाठी सज्ज असलेल्या विमानात राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार..., इतक्यात पवार त्यांना म्हणाले, "तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या." पवार यांच्या या बोलण्याचा मान राखत खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. राजकारणातील प्रत्येक गोष्ट प्लांटेड असते, हा एक गैरसमज आहे. राजकीय नेत्यांच्याही आवडीनिवडीची काही खास माणसं असतात, त्यांनाही आवडीच्या माणसांशी गप्पा मारायला आवडतं, हे आपण विसरतो. अर्थात, या गप्पांमध्ये राजकीय विषय निघालेच नसतील, असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल. *फोटो :* शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे (मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे) विमानातही उभे राहिले!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishal Patil Sangli Loksabha : विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Shriya Pilgaonkar : 'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Law College Student on Loksabha Election : कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणाचं नेतृत्व हवं?Sandipan Bhumare Nomination File Submited : अर्ज दाखल, संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचे उमेदवारMurlidhar Mohol Prachar Rally : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी भव्य रॅलीChhatrapati Sambhajinagar BJP Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या रॅलीत राज ठाकरेंचे फ्लेक्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishal Patil Sangli Loksabha : विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
विशालमुळे 'मशाल' अडचणीत अन् कारवाईचा 'हात' सुद्धा पुढे येईना! सांगलीत आज काय होणार?
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
नाशिकच्या जागेवरून महायुतीतील दोन ओबीसी नेत्यांमध्ये जुंपली, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर काय म्हणाले छगन भुजबळ?
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटावर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; शिरूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत हकीकत सांगितली!
Shriya Pilgaonkar : 'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
'तू सुप्रिया आणि सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहेस का?' अखेर श्रियाने सोडलं मौन, म्हणाली,'माझं जन्मप्रमाणपत्र...'
Pragya Mishra : ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
ChatGPT च्या ओपन AI ने भारतात पहिला कर्मचारी नेमला; कशी झाली नेमणूक अन् शैक्षणिक पात्रता काय?
Arijit Singh Birthday : अरजित सिंहची ही पाच गाणी, तुमच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही!
अरजित सिंहची ही पाच गाणी, तुमच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाही!
Pankaja Munde: 32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
32 लाखांचे दागिने, मुंबईत कोट्यवधीचा फ्लॅट; पंकजा मुंडेंची संपत्ती पाच वर्षात किती कोटींनी वाढली?
MAHARERA:  पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
पार्किंचा वाद टाळण्यासाठी महारेराकडून विकासकांना स्पष्ट निर्देश; आकार, रुंदी, उंची, ठिकाण सगळ्याची चोख माहिती द्यावी लागणार
Embed widget