(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Recap : शरद पवारांचा राजीनामा, मणीपूर हिंसाचार ते रिफायनरीवरून राजकारण वाचा या आठवड्यात काय घडलं?
Weekly Recap : या आठवड्यात 1 ते 6 मे दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात या बातम्यांचा आढावा.
India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय...
महाराष्ट्र दिन आणि वज्रमूठ सभा
राज्यात सर्वत्र ध्वजारोहण करुन महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करतात. यावर्षीही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. दिवसभर महाराष्ट्र दिनाचा उत्साह तर सायंकाळपासून महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेच्या बातम्या.. या सभेत अजित पवार बोलणार की नाही याची उत्सुकता होती, पण त्यांनी जोरदार भाषण तर केलं. ( 1 मे 2023 वाचा सविस्तर )
महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात निधन
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (2 मे 2023 वाचा सविस्तर)
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांचा विरोध
2 मे रोजी 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याची घोषणा केलेली. वज्रमूठ सभेची चर्चा दुसऱ्या दिवशीही सुरुच होती, मात्र मंगळवारची महत्वाची बातमी ठरली ती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पद सोडण्याच्या निर्णयाची.. त्यांचा हा निर्णय कार्यकर्त्यांना जरी अनपेक्षित असला तरी अनेक निकटवर्तीयांना माहिती होता. शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन करताना केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. तेव्हापासून राज्यात एकच विषय चर्चेचा मुद्दा ठरला. त्यांचा राजीनामा परत घ्यावा यासाठी नेत्यांसह अनेकांनी आर्जवं विनंत्या केल्या (2 मे, 2023 वाचा सविस्तर)
शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमस्थळी त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यभरातून राजीनाम्याचं सत्र सुरु झालं. तसंच पवारांचा राजीनामा ही राजकीय खेळी तर नाही ना.. याचीही चर्चा सुरु झाली. अजित पवारांना या निर्णयाची आधीपासून माहिती होती, असं एकूण त्यावेळच्या परिस्थितीवरुन जाणवत होतं. त्यामुळेच त्यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी किंवा कन्या सुप्रिया सुळे यांचा भविष्यातील प्रवास सुकर करण्यासाठीच शरद पवारांनी हा निर्णय घेतला, असं विश्लेषणही जाणकारांनी केलं. एकूण काय तर हा संपूर्ण आठवडा या एकाच घटनेनं व्यापून टाकला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आवेग पाहून स्वतः शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या मार्फत कार्यकर्त्यांना निरोप पाठवला की त्यांनी आता आपापल्या घरी जावं, तरच ते कार्यकर्त्यांच्या मागणीवर विचार करतील. (वाचा सविस्तर)
एफआयआर नोंदवला...सुरक्षा मिळाली; सुप्रीम कोर्टात आज काय झालं?
राजधानी नवी दिल्लीत जंतर मंतरवर लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत महिला कुस्तीपटूंनी धरणं धरलं आहे. हा आठवडा दिल्लीत त्याचीच चर्चा आहे. बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांसोबत या आंदोलक पैलवानांची बाचाबाचीही झाली. तसंच आज सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी झाली. कुस्तीसंघाचे अध्यक्ष खा. बृजभूषण सिंह यांच्यावर दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, याची खात्री पटल्यावर सुप्रीम कोर्टाने सुनावणी संपवली. (वाचा सविस्तर)
हिंसाचारात 54 जण ठार; परिस्थिती लष्कराच्या नियंत्रणात
दिल्ली आणि मुंबईत अशा घडामोडी घटत असताना तिकडे ईशान्य भारतात मणिपूर मात्र धुमसत आहे. तिथे आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी यांच्यातील संघर्षाने उग्र स्वरुप धारण केलंय. मणिपूरची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आलंय, तसंच लष्कराला दिसताक्षणी गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील काही दिवसपासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 54 जण ठार झाले असल्याचे वृत्त पीटीआय (PTI) या वृत्तसंस्थेने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. (वाचा सविस्तर)
कर्नाटकात आज प्रचाराची रणधुमाळी
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Elections) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कर्नाटकात राजकीय रविवार पाहायला मिळणार आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) प्रचारासाठी रिंगणात उतरणार आहेत, तर दुसरीकडे राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधीही (Priyanka Gandhi) काँग्रेसच्या (Congress) बाजूनं जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. (वाचा सविस्तर)
'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी
भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. सुवर्णवेध साधत 'दोहा डायमंड लीग'चा खिताब नीरज चोप्रानं पटकावला आहे. नीरज चोप्राने नव्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली आहे. दोहा येथे सुरु असलेल्या डायमंड स्पर्धेवर नीरज चोप्राने नाव कोरलेय. दोहा येथील कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्रा याने बाजी मारली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर दूर भाला फेकला. टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा जॅकब वडलेज्च दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स तिसऱ्या स्थानावर राहिलाय. (5 मे, 2023 वाचा सविस्तर)
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण
एबीपी माझाचा 'महाकट्टा', एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'ला अकरा वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्तानं 'महाकट्टा'चं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या महाकट्टा सोहळ्यात 'कट्टा नात्यांचा, सोहळा संवादाचा' साजरा करण्यात आला. कट्ट्यावर राजकीय, मनोरंजन, क्रिडा विश्वातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. ( वाचा सविस्तर 5 मे, 2023)
रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच, उद्धव ठाकरे यांचं आव्हान
"लोकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही. रिफायनरीचं समर्थन करुन दाखवाच, असं आव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यकर्त्यांना दिलं आहे. उद्धव ठाकरे आज बारसू (Barsu) दौऱ्यावर आहेत. राजापूरमध्ये पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोलगावात (Solgaon) रिफायनरी विरोधकांसोबत संवाद साधला. यावेळी स्थानिकांचा विरोध असल्यास रिफायनरी होऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सोलगावातील नागरिकांनी यावेळी रिफायनरी विरोधात घोषणाबाजी देखील केली. (वाचा सविस्तर 6 मे)