Mahatma Gandhi grandson Passes Away: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचं कोल्हापुरात निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Arun Gandhi Passes Away : महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Arun Gandhi Passes Away : लेखक आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन (Mahatma Gandhi grandson Arun Gandhi passes away ) झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तुषार गांधी हे कोल्हापूरकडे रवाना झले आहेत.
अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते.
Bereaved. Lost my father this morning🙏🏽
— Tushar बेदखल (@TusharG) May 2, 2023
अरुण गांधींचे द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी (The Gift of Anger: And Other Lessons from My Grandfather Mahatma Gandhi) हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अरूण गांधी हे काही वर्षापूर्वी अमेरिकेत वास्तव्यास होते. महात्मा गांधीप्रमाणे ते अहिंसेच्या मार्गाचे पालन करत असे. यासाठी त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती.
कोण आहेत मणिलाल गांधी?
अरुण गांधी हे महात्मा गांधींचे दुसरे पुत्र मणिलाल गांधी यांचे पुत्र होते. मणिलाल गांधी हे अखबार इंडियन ओपिनिअन संपादक होते. त्यांची आई या वृत्तपत्राच्या पब्लिशर होत्या.