Maharashtra Election Result : महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Maharashtra Assembly Election Result 2024 : महाविकास आघाडीचे रोहित पाटील, रोहित पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनी आघाडीवर घेतल्याचं दिसून आलं.
![Maharashtra Election Result : महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर Maharashtra Assembly Election Result maha vikas aghadi seat lead numbers vs mahayuti Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Election Result : महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/21/b3cb49c881d8d259dfdb825cec30a4b7172691316596289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यातील निवडणुकीचे सुरूवातीचे कल हाती आले असून त्यामध्ये महाविकास आघाडीने शतक पूर्ण केल्याचं दिसून आलं. पहिल्या कलांमध्ये महाविकास आघाडीने 105 जागांवर आघाडी घेतली आहे. तर त्याचवेळी महायुती 131 जागंवर आघाडीवर आहे. राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये पोस्टर मतांमध्ये युगेंद्र पवार आघाडीवर होते. मात्र ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाल्यानंतर अजितदादांनी आघाडी घेतली.
कोण आघाडीवर?
- अजित पवार
- दादा भुसे
- नरहारी झिरवाळ
- एकनाथ शिंदे
- भरत गोगावले
- चंद्रकांत पाटील
- रोहित पवार
- रोहित पाटील
- अमित झनक
कोण पिछाडीवर?
- रोहिणी खडसे
- संजयकाका पाटील
- युगेंद्र पवार
- शहाजीबापू पाटील
- दीपक केसरकर
- भावना गवळी
- छगन भुजबळ
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल, पुढील १० तासांत जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभेचे वेगवान, अचूक निकाल तुम्हाला सकाळपासूनच एबीपी माझावर पाहता येणार आहेत... प्रत्येक मतदारसंघात कुणी मारली बाजी? कोण होणार तुमचा आमदार? कुणाची येणार सत्ता? काय घडामोडी घडणार? राष्ट्रपती राजवट लागणार का? कोण होणार किंगमेकर? या सर्व प्रश्नांची उत्तर, सविस्तर विश्लेषण.. तुम्हाला 'माझा'वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील.
एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)