एक्स्प्लोर
मुंबईत उदयोन्मुख कलाकारांसाठी वीक एण्ड आर्ट गॅलरी

मुंबई : मुंबईत उदयोन्मुख कलाकारांसाठी वीक एण्ड आर्ट गॅलरीला सुरुवात होत आहे. या वीकेंड आर्ट गॅलरीचं उद्धाटन युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलं. मुंबईतीस कालाघोडा परिसरात दर रविवार ही आर्ट गॅलरी भरवली जाणार आहे. या आर्ट गॅलरीमध्ये कलाकारांना आपल्या कलाकृती सादर करता येणार आहे. उदयोन्मुख कलाकारांना संधी मिळावी या हेतूनं ही आर्ट गॅलरी सुरु करण्यात आली आहे. मुंबईतील पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणवर्गाला आकर्षित करण्यासाठी आदित्य ठाकरेंनी ही आर्ट गॅलरी सुरु केल्याची चर्चा रंगत आहे. पण निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता अशी कामं नेहमी चालू असतात असा दावा आदित्य ठाकरेंनी केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
व्यापार-उद्योग























