एक्स्प्लोर

येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु : मुख्यमंत्री

आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. पंचनामे 80-90 टक्के पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांना दिलं.

उस्मानाबाद : येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तुळजापूरमधील काटगाव इथे पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करुन ते तुमच्या समाधानासाठी करु, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की, "मी तुम्हाला नवीन नाही किंवा तुम्ही मला नवीन नाही. तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली, वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला आहे. पुढचे सात-आठ दिवस परतीचा पाऊस कायम असेल. तुम्ही माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहात. संवग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही. मी जे बोलते ते करतो, पण जे करु शकत नाही ते बोलणार नाही. तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकडा घोषित करायला आलेलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ताकद द्यायला आलो आहे."

"आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तोपर्यंत पंचनामे 80-90 टक्के पूर्ण झाले आहेत. अंदाज आलेला आहे. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही. ते करु तुमच्या सुख-समाधानासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका. पुन्हा आपलं आयुष्य जोमाने सुरु करु यासाठी तुम्हाला दिलासा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलोय. काळजी करु नका, हे तुमचं सरकार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी मदत केल्याशिवाय राहाणार नाही हे वचन तुम्हाला देतो," अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना दिली.

संबंधित बातम्या

परतीच्या पावसाचं संकट टळलेलं नाही, घाईगडबडीने निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, देवेंद्र फडणवीसांची टीका

ठाकरे सरकार हे रडणारे सरकार आहे, ते काय अश्रू पुसणार? : प्रवीण दरेकर

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट मदत करणे गरजेचे: देवेंद्र फडणवीस

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आज उस्मानाबादमध्ये; बळीराजाच्या काय अपेक्षा?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्दMumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीरPanchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्दMumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Embed widget