एक्स्प्लोर
जायकवाडीत पाणी सोडण्याची तयारी सुरु, पोलीस बंदोबस्तात पाणी सोडणार
नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पण वरच्या धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. शिवाय नाशिकचे लोकप्रतिनिधी कोर्टात गेले आहेत.
![जायकवाडीत पाणी सोडण्याची तयारी सुरु, पोलीस बंदोबस्तात पाणी सोडणार Water to be released for Jayakwadi dam preparations being on administration level जायकवाडीत पाणी सोडण्याची तयारी सुरु, पोलीस बंदोबस्तात पाणी सोडणार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/10/26105052/nsk-darna-dam.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
A
अहमदनगर/नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या आदेशानंतर अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणातून पाणी सोडण्याची प्रशासनाची लगबग सुरू आहे. त्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन, जलसंपदा विभाग आणि महावितरण यांच्या बैठका सुरू असून हे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
भंडारदरा धरणातून अगोदर निळवंडे धरणात पाणी सोडले जात आहे. काल सुरु असलेला 4000 क्युसेकचा विसर्ग वाढवून 10000 करण्यात आला आहे. निळवंडे धरणाच्या गेटपर्यंत पाणी आल्यानंतर प्रवरा नदीतून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी रविवार उजाडण्याची शक्यता आहे. एकाच वेळी मुळा आणि निळवंडे धरणातून पाणी सोडण्याचे पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे.
एकीकडे प्रशासन आपली तयारी करत असताना दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि सर्वपक्षीय नेते पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. कोणत्याही परिस्थितीत पाणी जाऊ देणार नाही ही भूमिका घेत कालही दिवसभर आंदोलन सुरू होतं.
राहुरीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी नगर-मनमाड महामार्ग अडवत पाणी सोडण्याच्या निर्णयाचा निषेध केला. तर नेवासेचे माजी आमदार शंकरराव गडाख हजारो समर्थकांसह मुळा धरणाच्या गेटसमोर पोहोचले आणि दिवसभर त्यांनी गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. संध्याकाळी पोलिसांनी शंकरराव गडाख यांना ताब्यात घेतलं. आजही सोनईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
पाणी सोडल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावातील ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे एकीकडे पाटबंधारे विभाग पाणी सोडण्याचे नियोजन करत असताना होणाऱ्या विरोधाच्या आंदोलनातून हे पाणी जायकवाडी धरणाकडे जाताना प्रांतिक वाद निर्माण होणार आहे.
दारणा धरणाच्या दिशेने पाणी रवाना
जायकवाडीला पाणी सोडण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरु आहे. त्यासाठी भावली भाम, वाकी या छोट्या धरणातून दारणा धरणाच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. पोलीस बंदोबस्त मिळताच दारणा आणि गंगापूर धरणातून जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे. पाटबंधारे विभागाकडून जिल्हा प्रशासनला उशिरा पत्र मिळाल्याने जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. त्यानंतर जायकवाडीच्या दिशेने पाणी सोडलं जाणार आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधी दारणा धरणावर आंदोलन करून जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करणार आहेत. तर शहापूरला पाणी सोडण्याच्या विरोधात भावली धरणावर ग्रामस्थ एकवटणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
राजकारण
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)