एक्स्प्लोर
वर्ध्यात मोबाइल जुगारचा पर्दाफाश, 19 मुलं ताब्यात
वर्धा: तुमचा मुलगा स्मार्ट फोनचा वापर कशा प्रकारे करतो यावर बारीक लक्ष ठेवा. कारण, वर्ध्यात मोबाईलवर जुगार खेळणाऱ्या 19 मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, त्या मुलांच्या आई-वडिलांना आपल्या पाल्याच्या कारनाम्याची अजिबात कल्पना नव्हती.
एका कारवाईदरम्यान वर्धा पोलिसांनी तब्बल 200 स्मार्ट फोन्स जप्त केले आहेत. मोबाईल चोरांची मोठी टोळी पोलिसांच्या हाती लागली असेल असं तुम्हाला वाटत असेल. मात्र पोलिसांनी हे मोबाईल फोन चोरांकडून नव्हे तर कॉलेज तरूणांकडून जप्त केले आहेत.
कारण याच मोबाईल फोनमुळं शेकडो कॉलेज तरूणांना जुगाराचं व्यसन जडलं होतं. वर्ध्यातल्या पंकज पंजवाणी नावाच्या इसमानं मोबाईलवर जुगार खेळता येईल असं अँड्रॉईड बेस ऍप्लिकेशन तयार केलं होतं.
वर्धा आणि लगतच्या जिल्ह्यातले शेकडो तरूण दिवस-रात्र हा हायटेक जुगार खेळण्यात दंग असायचे. या ऑनलाईन जुगारातून होणारी कमाई पंकज पंजवाणीच्या खात्यावर जमा व्हायची
मोबाईल जुगाराचा धंदा चालवण्यासाठी आरोपीनं गरिब घरातील कॉलेज तरूणांना कामाला ठेवलं होतं. महिन्याला साडेतीन हजार रुपयांच्या पगारावर कॉलेज तरूण दोन शिफ्टमध्ये काम करायचे.
पंकज पंजवाणीच्या अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी 19 जणांना ताब्यात घेतलं. सध्या शाळेच्या उंबरठा ओलांडण्याआधीच मुलांच्या हातात स्मार्ट फोन येतो. मात्र आपला लाडका किंवा लाडकी त्या स्मार्ट फोनचा वापर कशासाठी करतात याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा स्मार्ट फोनमुळे तुमच्या पाल्याचं आयुष्य देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement