एक्स्प्लोर
सोलापुरात मतदाराचा रांगेत मृत्यू, अकोल्यात मतदानानंतर एकाचा बळी
सोलापूर : मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलं असताना सोलापुरात एका मतदाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गंगाधर शेटे यांचा मतदान करण्यापूर्वीच केंद्रावर मृत्यू झाला.
गंगाधर शेटे हे ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. त्यावेळी बुथवर रांगेत उभं असतानाच त्यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. सोलापुरातील प्रभाग क्रमांक 8 मधील ग. ल. कुलकर्णी प्रशालेत ही घटना घडली.
गंगाधर शेटे
अकोल्यातही मतदाराचा मतदानानंतर मृत्यू
मतदान करुन घरी परतल्यानंतर ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकोल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातील गोरक्षण रोडवरील कैलास नगर भागात राहणाऱ्या दीपक खानझोडे यांचा मृत्यू झाला.
दीपक खानझोडे हे अकोला अर्बन बँकेत नोकरीला होते. मतदान आटपून घरी आल्यानंतर दुपारी एक वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचा मृत्यू झाला.
दीपक खानझोडे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement