एक्स्प्लोर
भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विश्वजित कदम म्हणतात...
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर काँगेस आमदार विश्वजित कदम यांनी एका पत्राद्वारे हा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँगेस-राष्ट्रवादी मधील अनेक आमदार, नेते भाजपत येणार असल्याचा चर्चेला पेव फुटले आहेत.

सांगली : माझ्या भाजपमध्ये प्रवेशाच्या संदर्भात बातम्या काही माध्यमातून दाखवल्या जात आहेत. ज्यामध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी भाजप प्रवेशाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर काँगेस आमदार विश्वजित कदम यांनी एका पत्राद्वारे हा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँगेस-राष्ट्रवादी मधील अनेक आमदार, नेते भाजपत येणार असल्याचा चर्चेला पेव फुटले आहेत.
यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँगेस-राष्ट्रवादीमधील अनेक आमदारांची भाजप प्रवेशाबबत शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये सांगलीतील काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांची देखील भाजप प्रवेशाबाबत काही दिवसांपासून तर्कवितर्क लढविले जात आहेत.
विश्वजित कदम हे काँगेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचे पुत्र आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षातील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार पक्ष सोडतील अशा चर्चा आहेत. यामध् विश्वजीत कदम हेदेखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या चर्चांवर आता खुद्द कदम यांनीच पूर्णविराम लावला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
