एक्स्प्लोर

संभाजीराजे राजकीय प्रचाराला बळी पडले, 'तो' निधी भीक नव्हे तर जनतेने जिव्हाळ्याने केलेली मदत : विनोद तावडे

महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे, असं राजेंनी म्हटलं होतं.

मुंबई : बोरिवलीमधील रिक्षावाले, फेरीवाले, मोची, किरकोळ व्यावसायिक, सामान्य नागरिक यांनी आपापल्या कुवतीनुसार 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये देऊन जमा केलेला निधी म्हणजे महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी जिव्हाळ्याने पुढे केलेला मदतीचा हात आहे. मग ती रक्कम खासदार संभाजी राजे यांना भीक का वाटावी, असा प्रश्न मला पडला आहे. या आपत्तीच्या वेळी कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील आपल्या बंधू भगिनींना मदत करण्याची सर्वसाधारण माणसाला इच्छा होती आणि त्यासाठी मंत्री असूनही मतदारसंघात फिरून यासर्वांचं प्रेम, त्यांनी देऊ केलेली मदत एकत्र करून पूरग्रस्तांसाठी पाठविली, तर याला भीक का म्हणावे, हा प्रश्न ही मदत देणार्‍या प्रत्येक माणसाला पडला आहे आणि म्हणूनच पूरग्रस्तांसाठी मदत पाठविलेल्या जनतेच्या भावनांचा अनादर होत आहे, असे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते, असे विनोद तावडे यांनी म्हटले आहे.

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना भीकेची गरज नाही, संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा

गोर-गरीब रिक्षावाले, फेरीवाले, छोटे-छोटे दुकानदार, हातावर पोट असणार्‍या माझ्या गरीब जनतेकडून जमा झालेले 10-10 रुपये मिळून 3.50 लाख रुपये आणि इतर मोठ्या देणगीदारांकडून एकत्र झालेले 24.50 लाख रुपये, अशी एकूण 28 लाखांची रक्कम फक्त बोरिवलीकरांच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आली. हा आमचा खारीचा वाटा आहे, हे आम्हा सर्वांना माहीत आहे, असे तावडेंनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्या या मदतफेरीचे राजकीय द्वेषापोटी विडंबन केले, हे राजकारण म्हणून मी समजू शकतो. कारण, त्यांच्याकडे आता बाकी कोणतेही मुद्दे राहिले नाहीत आणि एका विधानसभेतून पहिल्यांदाच इतका मोठ्या प्रमाणात मदतनिधी जमा होतो, हे त्यांना पहावले नसेल. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकीय प्रचाराला संभाजी राजे यांनी बळी पडावे, याचे मला दुःख आहे, असे तावडे म्हणाले. आमच्यासारख्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अडचणीत असलेल्या जनतेला आधार दिला, गोरगरिबांचे प्रेम जमा करून पूरग्रस्तांसाठी पाठविले, याचे संभाजी राजे यांनी खरेतर कौतुक करायला हवे होते. पण त्याची राजे यांनी अवहेलना केली, याची मला खंत वाटते, असे तावडेंनी म्हटलं आहे. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीवरुन खासदार संभाजीराजे यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे निशाणा साधला होता. विनोद तावडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर उतरुन पूरग्रस्तांसाठी मदत मागितली होती. यावर संभाजीराजे चांगलेच संतापले आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी विनोद तावडे यांना सुनावलं होतं. त्यांनी फेसबुकवर आपला रोष व्यक्त केला आहे. स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे, असं राजेंनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Nashik News: 8 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनंतर त्याच आश्रमशाळेतील 24 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, प्रशासन अलर्ट मोडवर; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
8 वर्षीय चिमुकलीच्या मृत्यूनंतर त्याच आश्रमशाळेतील 24 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, प्रशासन अलर्ट मोडवर; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Shahaji Bapu Patil: अशोक खरात सारख्या महाराजांच्या बापाचाही मी बाप; महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल चित्रपटात घोटाळा, कारण...; सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात शहाजीबापूंची तुफानी फटकेबाजी
अशोक खरात सारख्या महाराजांच्या बापाचाही मी बाप; महाराष्ट्र एल्फिन्स्टन फाईल चित्रपटात घोटाळा, कारण...; सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात शहाजीबापूंची तुफान फटकेबाजी

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत
Eknath Shinde Thane: ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
ठाण्यात एकनाथ शिंदेंचं भाषण सुरू असतानाच समईनं घेतला पेट; प्रताप सरनाईकांनी प्रसंगावधान राखत विझवली आग, स्टेजवर नेमकं काय घडलं?
Beed Well News: निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडी ठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
निसर्गाचा अनोखा चमत्कार! बीडमध्ये कोरडीठाक विहीर अचानक पाण्याने तुडूंब भरली; भगवान गडाच्या पायथ्याशी नागरिकांची मोठी गर्दी
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Embed widget