एक्स्प्लोर

Accident News: काम करताना किरकोळ वाद; थट्टामस्करीत म्हणाला, मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो अन्... ; किरकोळ वादातून पुण्याच्या तरुणाचा गोव्यात दुर्दैवी अंत

Accident News: भाड्याच्या खोलीत मैत्रिणीसोबत राहणाऱ्या एका २६ वर्षांच्या तरुणाचा थट्टामस्करीत स्वतःच्या पोटात सुरी खुपसल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला.

म्हापसा: कामाच्या ताणतणावात किंवा किरकोळ वादाच्या वेळी नकळत केलेली एक चुकीची कृती आणि मस्करी किती भयानक व जीवघेणी ठरू शकते, याचा धक्कादायक प्रत्यय गोव्यातील (Accident News) राय-शिवोली (ता. हणजूण) येथे आला आहे. भाड्याच्या खोलीत मैत्रिणीसोबत राहणाऱ्या एका २६ वर्षांच्या तरुणाचा थट्टामस्करीत स्वतःच्या पोटात (Accident News) सुरी खुपसल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.(Accident News)

रोहित प्रवीण जळगावकर (वय २६, मूळ रा. पुणे) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. रोहित आणि त्याची हैदराबाद येथील एक मैत्रीण राय-शिवोली येथील एका भाड्याच्या खोलीत एकत्र वास्तव्यास होते. दोघेही माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील एका कंपनीत कार्यरत होते आणि घरातूनच 'वर्क फ्रॉम होम' (Work From Home) पद्धतीने आपले कंपनीचे काम करत होते.(Accident News)

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दोघेही आपापल्या काम करत असताना त्यांच्यात एका किरकोळ विषयावरून शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढत असताना रोहितने भावनिक भरात आणि मस्करीच्या ओघात स्वयंपाकघरातील धारदार सुरी उचलली. त्याची मैत्रीण काम करत असताना, रोहितने तिला घाबरवण्यासाठी आणि मस्करी म्हणून "मी स्वतःलाच सुरी भोसकून घेतो," अशी धमकी देण्यास सुरुवात केली.परंतु, ही मस्करी काही क्षणांतच भीषण दुर्घटनेत बदलली. रोहितच्या हातातील धारदार सुरी थेट त्याच्या पोटात खोलवर रुतली. सुरी पोटात शिरताच मोठा घाव निर्माण झाला आणि काहीच वेळात खोलीत रक्ताचा सडा पडला. हा भयानक प्रकार पाहून त्याची मैत्रीण प्रचंड घाबरली. तिने तात्काळ मदतीसाठी आरडाओरड केली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहितला तात्काळ शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले.

परंतु, पोटात गंभीर दुखापत झाल्यामुळे अतिप्रमाणात रक्तस्राव झाला होता. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रोहितचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून खोलीतून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. घटनेच्या वेळी खोलीत उपस्थित असलेल्या रोहितच्या मैत्रिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची सखोल जबानी नोंदवून घेतली आहे. हणजूण पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची (Accidental Death) नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
Jalgaon : जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
जळगाव जिल्हा परिषदेत 'बोगस' दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, प्रशासकीय वर्तुळात खळबळ
Jalgaon Crime News: जळगावच्या लोंणजे गावात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू; 13 जणांविरुद्ध गुन्हा, 10 जणांना अटक
जळगावच्या लोंणजे गावात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू; 13 जणांविरुद्ध गुन्हा, 10 जणांना अटक
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Advertisement

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
Embed widget