Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Devendra Fadnavis on Mumbai Railway: मुंबईकर मेट्रोच्या (Mumbai Metro) प्रेमात आहेत. मात्र आपली मुंबई लोकल (Mumbai Suburban Railway) अजूनही जूनीच आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून मेट्रोसारखे डब्बे मुंबई लोकलसाठी तयार करावे, असं ठरवले आहे. आता 2029 पर्यंत सर्व लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील. बंद होणारे दारं, शंभर टक्के एसी, अतिशय स्वच्छ कोच, वेळेवर धावणाऱ्या आणि नवीन सिग्नलिंग सिस्टीमसहित सुसज्ज कोच मिळतील. आणि हे सगळं केल्यानंतरही सेकंड क्लासचं भाडं वाढणार नाही. एसी आम्ही देऊ, पण आम्ही भाडेवाढ करणार नाही. अशी मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा इन्फ्रा व्हिजन' (Majha Infra Vision) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Devendra Fadnavis: मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात, मुंबई लोकल मात्र अजूनही जुनीच, मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?



















