Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी राज्यातील 'डीजे' (DJ) आणि 'डॉल्बी' साऊंड सिस्टमच्या वापरावर अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे.सध्याच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या माझा इन्फ्रा व्हिजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी यावर कडक भूमिका स्पष्ट केली आहे. नियमानुसार 'डीजे' वर 100 टक्के बंदी आहे आणि अशा बेकायदेशीर साऊंड सिस्टमवर पोलिसांकडून थेट जप्तीची कारवाई केली जाते. कायद्यानुसार डॉल्बीवर आधीच बंदी आहे, परंतु काही लोक 'आम्ही डॉल्बी नाही तर फक्त स्पीकर लावून पेनड्राईव्हवर गाणी वाजवतोय' अशी पळवाट काढतात, ज्याचा सामान्य नागरिकांना शंभर टक्के त्रास होतो.सण साजरे करताना डीजे किंवा मोठ्या स्पीकरचा वापर न करता पर्यावरणपूरक पद्धतीने आणि पारंपरिक वाद्यांचा वापर करूनच सण साजरे केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.



















