Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
नेपाळच्या या फ्लॅश फ्लडला वातावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग जबाबदार आहे का, यावर सध्या जोरदार चर्चा रंगतेय... त्यातच आज संयुक्त राष्ट्रांच्या वातावरणविषयक संस्थेनं एक इशारा दिलाय... २०२७ हे वर्ष आजवरच्या मानवी इतिहासातलं सर्वात ऊष्ण वर्ष ठरण्याची शक्यता आहे... आणि याला जबाबदार आहे सध्या देशात दुष्काळी स्थिती निर्माण करणारा 'एल निनो'...
मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अनेक भागांत असलेलं हे दृष्य...
या सगळ्याला कारणीभूत असलेल्या 'एल निनो'बाबत एक वाईट बातमी आलीय...
जागतिक हवामान संघटनेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार फेब्रुवारी २०२७ पर्यंत 'एल निनो' कायम राहील, अशी शक्यता जवळजवळ १०० टक्के आहे...
इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या धोक्याबद्दल इतक्या तीव्रतेनं इशारा देण्यात आल्यामुळे चिंतेत भर पडलीय...
आपल्या डोळ्यांसमोर एल निनोचा आकार महाभयंकर होतोय.
विज्ञानात आता शंका घेण्यासारखं काहीही उरलेलं नाही...
आपली पृथ्वी एका अनोळखी आणि धोकादायक प्रवासावर निघाली आहे...
आणि महासागर वेगानं तापत आहेत.
अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी चिंता बोलून दाखवलीय.
प्रशांत महासागरातील वारे मंदावल्यामुळे समुद्राचं पाणी तापल्यानं साधारणतः दर २ ते ७ वर्षांनी एल निनो स्थिती निर्माण होते.
सध्या हे तापमान नेहमीपेक्षा तब्बल २ अंश सेल्सिअसनं वाढल्यामुळे एल निनो अधिक घातक झाल्याचं तज्ज्ञ मानतायत...
All Shows































