Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर आग राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ आले... भुजबळांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन जरांगेंच्या मागण्यांवर टीका केली... त्यामुळे खवळलेल्या जरांगेंनी आपल्या खास शैलीत भुजबळांना लक्ष्य केलं... अगदी व्होट बँकेपासून ते जात पडताळणी समितीवर दबावापर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये तू तू मै मै रंगल्याचं दिसलं... बघुयात आज झालेल्या या जुगलबंदीवर आमचा स्पेशल रिपोर्ट...
मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी शुक्रवारी आपला तोफखाना छगन भुजबळांकडे वळवला...
मराठा आंदोलनाबाबत भुजबळांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन काही दावे अन् काही आरोप केले...
त्यावरून दोघांमध्ये चांगलीच जुलगबंदी रंगली...
भुजबळांनी महायुतीला ओबीसी मतपेढीची आठवण करून देताच जरांगे यांनीही मराठा मतं दूर जातील, असा इशारा देऊन टाकला...
पात्र नसतानाही प्रमाणपत्रांसाठी जात पडताळणी समितीवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप भुजबळांनी केला...
ओबीसींच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्या भुजबळांची जरांगेंनी जोरदार खिल्ली उडवली...
जरांगे यांनी भुजबळांना लक्ष्य करताना त्यांच्यावर यापूर्वी झालेल्या आरोपांचा पाढाही वाचून दाखवला...
बाईट -- मनोज जरांगे, मराठा आरक्षण आंदोलक
All Shows































