एक्स्प्लोर

NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?

NSE IPO : नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आयपीओचा मार्ग मोकळा झाला आहे. सेबीनं एनएसईच्या आयपीओला मंजुरी दिली आहे, येत्या काही दिवसांमध्ये एनएसईचा आयपीओ लाँच होईल.

NSE IPO  नवी दिल्ली: नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या 30,000 कोटी रुयपांच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी मिळाली आहे.एनएसईचा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो. सेबीनं एनएसईला आयपीओच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यास मान्यता दिली आहे. एनएसईचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. एनएसईचे विद्यमान शेअर धारक 6 टक्के भागीदारी म्हणजेच 14.89 कोटी शेअर विकणार आहेत. ऑफर फॉर सेलद्वारे विकण्यात येणाऱ्या शेअरची रक्कम एनएसई नव्हे तर विद्यमान गुंतवणूकदारांना मिळेल.  

सूत्रांच्या माहितीनुसार एनएसई पुढील आठवड्यात आयपीओ संदर्भातील विविध गोष्टी जाहीर करु शकते. आयपीओ बोली लावण्यासाठी 15 सप्टेंबरला सुरु होईल आणि 24-25 सप्टेंबरला शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता आहे. एनएसईचा 30 हजार कोटींचा सर्वात मोठा ठरण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2024 ला ह्युंदाई मोटार इंडियाचा 27858.75 कोटी रुपयांचा आयपीओ आला होता. एनएसईचा आयपीओ त्यापेक्षा मोठा ठरेल.  

एनएसईच्या आयपीओनंतर रिलायन्स च्या जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचा आयपीओ येणार असून तो सर्वात मोठा आयपीओ ठरु शकतो. जिओ प्लॅटफॉर्म्सचा आयपीओ 37700 कोटी रुपयांचा असण्याचा अंदाज आहे. 

एलआयसीचा आयपीओ 20,557.23 कोटी, पेटीएम के 18,300 कोटी रुपये, टाटा कॅपिटल 15,511.87 कोटी रुपये आणि कोल इंडियाचा 15,200 कोटींचा आयपीओ होता, त्यापेक्षा एनएसईचा आयपीओ मोठा ठरण्याची शक्यता आहे. 

नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं 17 जूनला सेबीकडे डीएचआरपी दाखल केला होता. डीएचआरपीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया एनएसईमधील 2.48 कोटी शेअरची विक्री करेल. एमएस स्ट्रॅटेजिक (मॉरिशस) लिमिटेड 1.60 कोटी शेअरची विक्री करेल.स्टेट बँक ऑफ इंडियाची एनएसईमध्ये 3.23 टक्के भागीदारी आहे, तर एसबीआय कॅपिटल मार्केटसकडे 4.33 टक्के भागीदारी आहे. स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची एनएसईमध्ये 4.44 टक्के भागीदारी आहे. एलआयसीकडे 10.72 भागीदारी आहे. मात्र, एलआयसी  त्यांची भागीदारी विकणारन ाही. 

एनएसईच्या संचालक मंडळानं 6 फेब्रुवारीला आयपीओ लाँच करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सेबीकडून त्यापूर्वी एनएसईला एनओसी मिळाली होती. एनएसईनं 2016 मध्ये ऑफर फॉर सेलद्वारे 10 हजार कोटी रुपये उभे करण्यासाठी डीएरएचपी जारी केला होता. मात्र, विविध कारणांमुळं सेबीनं त्याला मंजुरी दिली नव्हती. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
कमी काळात नोकरी हवीय? मग हे अभ्यासक्रम निवडा, 6 महिन्यात नोकरी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget