एक्स्प्लोर
Advertisement
ओबीसी मंत्र्यांना आश्वासनपूर्तीसाठी पहिली हाक दिल्लीतून
स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या वेगवेगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. एससी वर्गासाठी बार्टी, मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि त्यानंतर ओबीसी वर्गासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना झाली.
नवी दिल्ली : ओबीसी मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेल्या विजय वडेट्टीवार यांना आश्वासनपूर्तीची पहिली हाक दिली ती दिल्लीतल्या यूपीएससीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांनी. बार्टी च्या धर्तीवर ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी या वर्गासाठी महाज्योती ही संस्था स्थापन करण्याची घोषणा झाली. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यानं हे विद्यार्थी त्रस्त आहेत. त्याबद्दल तातडीनं कारवाई करण्यात यावी ही मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या वेगवेगळ्या समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या संस्था आहेत. एससी वर्गासाठी बार्टी, मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी आणि त्यानंतर ओबीसी वर्गासाठी महाज्योती या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेची नोंदणी होऊन काही महिने झालेले आहेत. परंतु प्रत्यक्षात या संस्थेसाठी शासनाकडून अद्याप कुठलंही कार्यालय, निधी, मनुष्यबळ दिलेलं नाही. त्यामुळे महाज्योतीचं संकल्पित कार्य सुरु होऊ शकलेलं नाही. त्याबाबत ओबीसी वर्गातल्या अनेक नेत्यांना या विद्यार्थ्यांनी साकडं घातलेलं आहे. त्यामुळे आता या मागणीची दखल ओबीसी नेते तातडीनं घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Vijay Wadettiwar | पक्षाविरोधात नाराजी नव्हती पण खात्याबाबत आग्रही होतो : वडेट्टीवार | ABP Majha
यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीची ही योजना नेमकी कशी असणार आहे.
या योजनेंतर्गत पाचशे विद्यार्थी दिल्लीतल्या तयारीसाठी प्रवेश परीक्षेद्वारे निवडले जाणार आहेत. त्यांना कोचिंग फीसाठी दोन लाख रुपये आणि तेरा हजार रुपये प्रति महिना असे पंधरा महिन्यांचे विद्यावेतन दिले जाणार आहे. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर पन्नास हजार रुपये, आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर पंचवीस हजार रुपये मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत. एमपीएससी, पीएचडी, परदेशी शिक्षण यासाठीही अशाच प्रकारची योजना महाज्योती अंतर्गत आहे.
संबंधित बातम्या :
काश्मिरमध्ये इंटरनेटवर पूर्णपणे बंदी जाचक; सुप्रीम कोर्टाचे केंद्र सरकारला खडे बोल
थोरातांच्या दिल्ली भेटीनंतर वडेट्टीवारांचा रुसवा दूर, पदभारही स्वीकारला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement