एक्स्प्लोर

Nagpur News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी ऑक्सीजन बर्ड पार्कचे आज लोकार्पण; काय आहेत प्रकल्पाचे वैशिष्ट्य?

Nagpur News: उपराजधानी नागपुरात आज आगळावेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

Nagpur News नागपूर : उपराजधानी नागपुरात (Nagpur News) आज आगळावेगळ्या ऑक्सिजन बर्ड पार्कचे लोकार्पण होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हे विशेष पार्क भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर ऑक्सीजन बर्ड पार्क (Oxygen Bird Park) नावाने साकारण्यात आले आहे. 

एकूण 14.32 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून जवळपास 20 एकरमध्ये साकारण्यात आला आहे. याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट आणि पक्ष्यांच्या आवडीच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे 8 हजार 104 प्रकारच्या वनस्पतींसह ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात त्या भागातील नैसर्गिक तळ्यांनाही त्याच स्वरूपात समाविष्ट करून घेण्यात आले आहे.

8 हजार 104 प्रकारच्या वनस्पतींसह अनेक सुविधांनी सुसज्ज ऑक्सिजन पार्क

या ऑक्सिजन बर्ड पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेष क्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईनचे आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी या उद्यानात लावण्यात आली आहे. नागपूर-वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे हे ऑक्सीजन पार्क साकारण्यात आले आहे.

या पार्कचे आज लोकार्पण होणार असून या कार्यक्रमाला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, आमदार अभिजित वंजारी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार कृपाल तुमाने, आमदार अनिल देशमुख, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Akshy shinde funeral: अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 05 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : राज्यातील 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP MajhaSolapur Airport : PM मोदींच्या हस्ते झालेल्या विमानतळाच्या उद्घाटनाला महायुतीच्या आमदारांची दांडीAkshay Shinde Encounter : एन्काऊंटर संदर्भात धक्कादायक ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
शिंदे आणि फडणवीस मोठा विषय नाही, महायुतीकडे चेहरा आहे का? केवळ खोक्यांचा चेहरा; नाना पटोलेंचा कडाडून हल्लाबोल
Akshy shinde funeral: अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
अक्षय शिंदेच्या अंत्यविधीला उल्हासनगरमध्येही विरोध, स्मशानात पोहोचली लोकं; कडक बंदोबस्त तैनात
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
Video : नाही, नाही म्हणत 10 आयपीएल खेळतो, शाहरुखचा MS धोनीला टोला; स्वत:लाही चिमटा
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
चंद्रपुरातील शाळा अदानींकडे, शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कुणाचा; संजय राऊतांवरही टीका
Tractor Ran over Children : घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
घराबाहेर खेळणाऱ्या तीन चिमुरड्या चुलत भावांवर ट्रॅक्टर घातला, एक ठार, दोन जखमी; 4 दिवसांपूर्वीच चिरडण्याची धमकी
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
GR निघाला... ओबीसी कल्याण मंडळाकडून 75 विद्यार्थ्यांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
सोलापूर विमानतळाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन, मात्र महायुतीच्याच आमदारांची कार्यक्रमाला दांडी, चर्चांना उधाण
Embed widget