एक्स्प्लोर

Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच

chhatrapati sambhaji nagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये हरिभाऊ बागडे यांचा सत्कारसोहळा. मुलाचं ऑपरेशन सोडून नितीन गडकरी बागडेंच्या सत्कार सोहळ्याला.

छत्रपती संभाजीनगर: अलीकडच्या काळात  राजकारण म्हणजे फक्त सत्ताकारण झाले आहे. राष्ट्रपती हा पूर्व राष्ट्रपती होऊ शकतो किंवा खासदार, मुख्यमंत्री माजी होऊ शकतात. पण कार्यकर्ता कधीच माजी होऊ शकत नाही. जिवंत मासा हा नेहमी पाण्याच्या प्रवाहाच्या विरोधात पोहत असतो. याउलट मेलेला मासा पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले. ते शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी केली. 

मागच्या जन्मी जो पाप करतो, तो एकतर पेपर काढतो किंवा साखर कारखाना सुरू करतो. आता माझ्यावर 16 कोटींचे कर्ज आहे. कार्यकर्ता आमच्या पक्षाची ताकद आहे. कार्यकर्ता आमच्या पक्षाची ताकद आहे. आज सत्ता आहे. पण जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा देखील कार्यकर्ता काम करत होता, त्याने कधी तक्रार केली नाही. कार्यकर्ता आमच्या पक्षाची ताकद आहे. हरिभाऊ बागडे यांचा राज्यपाल म्हणून सत्कार करण्यापेक्षा 80 वर्षाचे  कर्मठ कार्यकर्ते म्हणून सत्कार करण्याचा आम्ही ठरवले होते, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

महासत्ता व्हायचं असेल तर जातीपातीचं राजकारण बंद करायला हवे: नितीन गडकरी

आपल्याला जगातील तिसरी महाशक्ती व्हायचे आहे. पण यासाठी सध्या जे जातीपातीचे राजकारण चालते, ते आपल्याला समाप्त करायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी जातीपात केला नाही. मी कधीही जातपात केला नाही. 'जो करेगा जातपात की बात, उस्को मारेगें कसके लाथ', हे आपले धोरण असले पाहिजे. हरिभाऊ बागडे हे राजकारणात पक्षासाठी छोट्या पणतीप्रमाणे काम करत राहिले, असे कौतुकोद्गार नितीन गडकरी यांनी काढले. 

मुलाचं ऑपरेशन सोडून नितीन गडकरी हरिभाऊ बागडेंच्या सत्कार सोहळ्याला

बरेच लोक म्हणतात हरिभाऊ यांना राष्ट्रपती बनवा. मी असे म्हणणार नाही, शांतपणे आपले काम करत रहा जे मिळायचे ते मिळेल, नाही मिळायचं तर नाही मिळेल. कार्यकर्त्याचा चांगुलपणा म्हणजे जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो त्यावेळी तो काही बोलत नाही आणि काम करत राहतो. त्यामुळे आजचा सत्कार हा आदर्श कार्यकर्ताचा आहे. आज माझ्या मुलाचं मोठं ऑपरेशन झालं, पत्नी म्हणली तुम्ही इथे असायला हवं. पण मी म्हटले लगेच जाऊन येतो. ज्या कार्यक्रमात जात आहे, तो पक्षासाठी झटणाऱ्या एका सच्च्या कार्यकर्त्याचा सत्कार आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले

संभाजीनगरला आल्यावर मला संकोचल्यासारखे वाटते, आमच्याकडे कुणीही सत्काराला येत नाही. कुत्राही स्वागताला आला नाही पाहिजे असे मला वाटते. लोक आम्हाला आधी गोटे मारून पळवून लावायचे. मी प्रचार करताना माझी रिक्षा जाळून टाकली. अनेक लोकांचा त्याग असल्याने आम्हाला मंत्रिपद मिळाले आहे. आता आमची जी लोकप्रियता आहे, ती आमची नाही तर कार्यकर्त्यांची आहे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

अमित शाह नागपुरात, नितीन गडकरी काश्मिरात; राज्यातील राजकारणापासून गडकरींना कोण दूर ठेवतंय? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar on Madhukar Pichad Demise : जुना सहकारी हरपला, मधुकर पिचडांच्या निधनावर शरद पवार भावूकChandrashekhar Bawankule : Raj Thackeray आणि आमचे विचार जुळतात, बावनकुळेंचं सूचक वक्तव्यDevendra Fadnavis on Raj Thackeray : पालिका निवडणुकीत जिथं शक्य तिथं राज ठाकरेंना सोबत घेणार :फडणवीसCongress Rajya Sabha : राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
मुंबईकरांची ऐपत कायच्या काय वाढली, 2 कोटी रुपयांच्या घरांची खटाखट विक्री, टू बीएचकेला अधिक पसंती
Devendra Fadnavis & Raj Thackeray: भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
भाजप राज ठाकरेंच्या मनसेला सत्तेत वाटा देणार का? खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका; व्हिडीओ समोर!
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
'जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका', ठाकरे गटाच्या आमदाराचे सोयाबीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांना खरमरीत ट्विट म्हणाले..
Embed widget