एक्स्प्लोर
'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'

नागपूर: 'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करत असून ते संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे.' असं मत अखिल भारतीय उलेमा बोर्डचे अध्यक्ष सय्यद आलमगीर अश्रफ यांनी व्यक्त केलं. त्यांच्या नेतृत्वात काल नागपुरात डॉ झाकीर नाईक विरोधात आंदोलन करण्यात आलं. भारतासह संपूर्ण जगात कट्टरता पसरवणाऱ्या झाकीर नाईक विरोधात कडक केली पाहिजे अशी मागणी यावेळी मुस्लिम बांधवांनी केली. तसंच झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला मिळणाऱ्या निधीचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम आंदोलनकर्त्यांनी केली. 'प्रक्षोभक भाषणांमधून झाकीर नाईक देशातील नागरिकांना भडकवण्याचे काम करत आहे. मुस्लिम युवकांनी त्याच्या भूलथापांवर विश्वास ठेऊ नये.' असेही सय्यद आलमगीर अश्रफ म्हणाले.
आणखी वाचा























