एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणा आणि मतदान करा, उद्धव ठाकरेंचे कर्नाटकातील मतदारांना आवाहन

बारसूमध्ये मी आमच्या लोकांना भेटायला जातोय, राज्यातील इतर प्रकल्प गुजरातला जात आहेत. पालघरमध्ये लोकांना घरात घुसून बाहेर काढलं असे  म्हणत उध्दव ठाकरेंनी टीका केली.

मुंबई :  मतदान करताना ‘जय बजरंगबली’ म्हणा आणि मतदान करा असे पतंप्रधान मोदींनी जाहीर सभेत सांगितले.  धार्मिक आवाहन केले म्हणून बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता पण कदाचित आता नियम बदलले असतील. देशाचे पंतप्रधानच हिंदूत्वाचा प्रचार करत असतील तर  कर्नाटकातील मराठी जनतेने देखील मतदान करताना 'जय भवानी, जय शिवाजी' म्हणा आणि मतदान करा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhhv Thackeray)  पत्रकार परिषदेत केले आहे. मराठी बांधवांच्या हित जपणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या उमेदवारांना मत द्या, असे उद्धव  ठाकरे म्हणाले. 

महाविकास आघाडीला आमच्याकडून तडा जाणार नाही

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येक पक्षाला पक्षंतर्गत बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या निर्णयानंतर मी त्यानवर बोलेन. माझ्याकडून तरी महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही. महाविकास आघाडीला तडा जाईल असं काहीही राष्ट्रवादीत होणार नाही.  

पुस्तकातील आरोपावर उद्धव ठाकरे म्हणाले...

  शरद पवारांचे (Sharad Pawar) आत्मचरित्र "लोक माझे सांगाती"मध्ये या आत्मचरित्रात शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयात दोनदा जाण्यावर  टीका केली आहे. यावर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवारांना सल्ला देणारा मी कोण?  दिलेला सल्ला त्यांना पचनी  पडेल का?

प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको

बारसूमध्ये मी आमच्या लोकांना भेटायला जातोय, राज्यातील इतर प्रकल्प गुजरातला जात आहेत. पालघरमध्ये लोकांना घरात घुसून बाहेर काढलं असे  म्हणत उध्दव ठाकरेंनी टीका केली.  प्रकल्पासाठी स्थानिकांवर जबरदस्ती नको असे  वक्तव्य  ठाकरेंनी केले आहे. 

हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं 

देशात हुकुमशाही येणार नाही असं मानणाऱ्या लोकांची एकता व्हायला हवी. मी व्यक्तीचा पराभव करण्यास माझा पाठिंबा नाही, वृत्तीचा पराभव करायची इच्छा असते. त्यासाठीच हुकुमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं , असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

शरद पवारांच्या आत्मचरित्रावर प्रतिक्रिया

 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात केल्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली होती. त्यावरही उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकाला आत्मचरित्र लिहिण्याचा अधिकार असतो. मी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात काय केलं हे जगजाहीर आहे.  प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य वाटतो. यापलीकडे काही बोलणं योग्य नाही.

संबंधित बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget