मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्या मनात नाही, या विषयाला कायमचा पूर्णविराम द्या, आत्मचरित्रात पवारांची भूमिका
Sharad Pawar: शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंची पुन्हा कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयाच दोनदा जाण्यावर टीका केली. त्यानंतर मुंबई क्रेंद्रशासित करण्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडल आहे
Sharad Pawar: शरद पवारांचे (Sharad Pawar) आत्मचरित्र "लोक माझे सांगाती"मध्ये ठाकरे गटाची कोंडी करणारा आणखी एक मजकूर आहे.. मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असं पवारांनी पान क्रमांक 417 वर लिहिलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप स्वतः ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं करत असतात.
शरद पवारांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात शिवसेनेवर परखड टीका केली आहे. शिवसेनेचा वैचारिक पाया तितकासा भक्कम नाही, असं मत शरद पवारांनी आत्मचरित्रात मांडले आहे. महाविकास आघाडी आकाराला येताना शिवसेनेचा कट्टर हिंदुत्ववाद बाधक ठरेल, अशी भीती काहींना होती. परंतु शिवसेनेच्या बाबतीत माझं मत ऐकाल, तर हा पक्ष वेळोवेळी कितीही जोरकसपणे भूमिका मांडो, त्याचा वैचारिक पाया तितका भक्कम नाही. शिवसेनेच्या पूर्वेतिहासावर नजर टाकली तर राजकारणासाठी आवश्यक लवचीकता त्यांनी वारंवार दाखवली आहे, असं लक्षात येतं.
इंदिरा गांधींना त्यांनी आणीबाणीत पाठिंबाही दिला होता आणि 1980 च्या निवडणुकांत इंदिरा काँग्रेसच्या पाठीशी शिवसेना उभी राहिली होती. त्याबदल्यात त्यांच्या वाट्याला विधानपरिषदेच्या दोन आमदार क्याही आल्या होत्या. मुस्लिमविरोध आणि दलितविरोध हा शिवसेनेच्या भूमिकेतला एक पैलू झाला. परंतु तो दिसतो तेवढा टोकाचा नाही, असं आमचं निरीक्षण होतं. संजय राऊतही या अनुषंगानं बाळासाहेबांच्या विचारांचे दाखले आम्हाला देत होते.
मंत्रालयात न जाणे पचनी पडले नाही
'मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुकवर साधलेला सहज संवाद मध्यमवर्गीयांना भावला. त्यांना सहकार्य केले पाहिजे, असे या वर्गाला वाटत होते. मंत्रालयाच्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती. या झाल्या उद्धव यांच्या जमेच्या बाजू. मात्र, उद्धवना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या. मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे, आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते', असे पवार यांनी आत्मकथेत पान क्रमांक 318 वर नमूद केले आहे.