(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray on PM Modi : मोदी परदेशात जाता तेव्हा इंडियाचे पंतप्रधान म्हणून जाता की मुजाहिद्दीनचे सेवक म्हणून जाता? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray on PM Modi : मित्र म्हणून तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसत असाल, तर कोथळा काढावा लागेल. ही अफझल खानाची स्वारी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला.
Uddhav Thackeray on PM Modi : छत्रपती शिवाजी महाराज यांना संपवायला अफझल खान आला, त्याचे थडगे प्रातप गडाच्या पायथ्यावर बांधलं. मित्र म्हणून तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसत असाल, तर कोथळा काढावा लागेल. ही अफझल खानाची स्वारी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. भाजप अख्खा उभा राहिला तरी उद्धव ठाकरेंना संपवू शकत नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
यावेळी रक्षा बंधन मुस्लिम भगिनीकडून करून घ्या असे मोदींनी आपल्या खासदाराना सांगितले, पण हिंमत असेल मणिपूरच्या भगिनीकडून बांधून घ्या. जर राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानूकडून घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले की, काळानुसार काही भूमिका घ्याव्या लागतात. मी भाजपला आज आव्हान देतो, आमचे हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचे नाही. आम्हाला अतिरेक्यांना बडवणारा हवा. जगातील सर्वात शक्तीमान नेता विश्वगुरु राज्य करत असताना हिंदूंना जन आक्रोश करावा लागत आहे. मी भाजपची साथ सोडली, हिंदुत्व नाही सोडलं. 9 वर्षात शक्तीमान असलेला नेता असताना हिंदू खतरे मे है अशा घोषणा येतात.
ते पुढे म्हणाले की, हल्ली पुलाखालून बरेच पाणी गेलं आहे. धरणच्या धरण वाहून गेले. उंट देखील आहेत आणि दुसऱ्यांची ओझी वाहणारी गाढव देखील आहेत. मला देवेंद्र फडणवीस यांची दया येते, किती ओझी वाहणार? भाजपमध्ये राम राहिलेला नाही आयराम राहिले आहेत. राम मंदिर बांधा पण आयरामाचे काय? अशीही विचारणा त्यांनी केली.
होय आम्ही विरोधीपक्ष आहोत
पीएम मोदी यांनी विरोधी इंडिया आघाडीवर केलेल्या टीकेचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. भारत मातेच्या हातात आम्ही बेड्या घालू देणार नाही, असे ठाकरे म्हणाले. ते म्हणाले की, मोदी तुम्ही परदेशात जातात बायडनला मिठ्या मारता, तेव्हा तुम्ही इंडियाचे पंतप्रधान म्हणून जातात की मुजाहिद्दीनचे सेवक म्हणून जाता?
आमचे आजोबा नास्तिक नव्हते, पण माझा देव आणि माझ्यात बडवा कशाला हवा. माझ्या आजोबांनी वाईट पद्धतीबद्दल लढा दिला होता. विंचवाचे बिऱ्हाड असते तसे आमच्या आजोबांचे होते, भटकंती करत आमचे घराणे मुंबईत आले. ठाकरे घराणे कधीही मागे राहिले नाही. तुम्ही घराणेशाहीचा आरोप करता तेव्हा तुमची घराणे कुठे होती? तुमचा काय संबंध होता स्वातंत्र्य लढ्यात? आता तुम्ही आमचे आदर्श पुसून टाकत आहात. इतिहासाची मडी उकरून काढता तेव्हा त्यात काय मिळते हाड आणि कवट. आता जे ईडी ईडी, सीबीआय येत आहेत हे अफझल खानाचे दूत आहेत. कर्नाटकमध्ये बजरंग बली नाही पावला, पण पेकाटात गदा मारली. अशी पेकाटात की परत उठणार नाही.
औरंगजेब तुमच्यामध्ये दडला आहे
ठाकरे म्हणाले की, हे म्हणतात औरंग्याची औलाद आहे. अरे कुठे आहे औरंग्या? मी असताना अशी दंगल झाली का? आज देखील औरंगजेब जिवंत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फोडणारा औरंगजेब जिवंत आहे का? फडणवीस साहेब तुमच्या पक्षात आहेत. औरंगजेब तुमच्यामध्ये दडला आहे. सगळीकडे हे आयरामाना मुख्यमंत्री करत आहेत. यांनी घात शिवसेनेचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजाशी केला. हल्ली यांच्यात असे आहेत कपडे अंगावर नसले तरी चालतील, असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांनाही टोला लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या