Uddhav Thackeray Speech: 'अनेक पक्ष स्वबळाचा नारा देताहेत, आपणही देऊ, स्वबळ हा आपला हक्क' : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे.
मुंबई : काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, खरं म्हणजे अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आपलं काम बोलतंय, ते पाहून अनेकांच्या पोटात मुरडा
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, असं भाषण करण कठीण आहे. समोर आपले शिवसैनिक नसताना मी एकतर्फी बोलतोय. राज्यात आज आपलं काम बोलतंय. अनेकांच्या पोटात त्यामुळे मुरडा येतोय. त्यांचं ते पाहतील, त्यांना औषध द्यायला मी डॉक्टर नाही. पण राजकीय औषध देईन. सत्ता न मिळवल्यानं अनेकांचा जीव कासावीस होतोय, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचं स्वबळावर भाष्य
अनेक राजकीय पक्ष या कोरोना काळात सुद्धा स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरतं असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ते म्हणाले की, स्वबळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे. ज्यावेळी शिवसेना स्थापन झाली तेंव्हा मराठी माणूस क्षुल्लक होता. मान सोडाच परंतु अपमान सहन करत होता. शिवसेना तेंव्हा स्थापन झाली नसती तर... जे माझे आजोबा सांगायचे आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे ते म्हणायचे आत्मविश्वास आणि आत्मबळ महत्त्वाचं आहे, असं ठाकरे म्हणाले.
संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला?
मुख्यमंत्री म्हणाले की, जेंव्हा शिवसेनेवर संकुचितपणाचे, प्रांतवादाचे आरोप झाले तेंव्हा देखील शिवसेनाप्रमुख पुढे गेले. संकटाला घाबरला तर तो शिवसैनिक कसला? संकटाच्या छाताडावर चाल करुन जाणे ही आमची शिकवण आहे, असं ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत जे दुर्दैवाने पराभुत झाले त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यांना मी सांगितलं पराभूत शब्द काढा, जो खचला तो संपला. आपल्या हिंदुस्थानचा पाया हा संघराज्याचा भाषावार प्रांत रचनेचा आहे हे आपण विसरता कामा नये. हिंदुत्त्व हेच राष्ट्रीयत्त्व! सर्वप्रथम देशाभिमान मग प्रादेशिक अस्मिता असं ते म्हणाले. टीका करणारे तुम्ही काहीही केलंत तरी टीका करणार. तुमच्या मनाला जे पटत ते करा. पूर्वी या खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणस तिथे घुसवली. मनगट आहेत पण त्यात ताकद नाही तर फायदा नाही. मराठी माणसाला शिवसेनाप्रमुखांनी तुझ्या मनगटात ताकद आहे तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणुस पेटुन उठला, असं ते म्हणाले.
स्थानिय लोकाधिकार समितीच्या शिवराय संचलन कार्यक्रमात मी जातो. त्या भागात चौफेर पाहतो. चौफेर पाहताना मोठमोठ्या ऑफिसकडे, इमारतींकडे, गच्चीतुन, खिडकीतुन, झाडावर चढुन लोक पहात असतात. हे अप्रुप आहे. आम्हीं एकमेकांना भेटल्यावर जय महाराष्ट्र बोलतो, पण 'जय हिंद, जय महाराष्ट्र', देश आधी. देशाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेचा आहे. जर या अस्मितेवर घाला आला तर संघराज्याच्या पायावर घाला होतोय, असं ते म्हणाले.