(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed News Update : मित्राला सोडून घरी परतणाऱ्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू, बीडमधील घटनेने हळहळ
Beed News Update : मित्राला परळी येथे सोडून घरी परतणाऱ्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू झाला आहे. बीडमधील दुर्देवी घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Beed News Update : परळीहून बीडकडे येणार्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान परळी-बीड मार्गावर घाटसावळीजवळ झाला आहे. हाफेज मारुफ फारोखी (वय , 23 रा.बशीर गंज बीड) आणि शाहेद बागवान (वय, 21 रा. बीड) अशी मृत्यू झालेल्या दोन्ही तरूणांची नावे आहेत. या घटनेने बशीरगंज भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हाफेज आणि शाहेद हे दोघे जण हैदराबादला जाणाऱ्या आपल्या मित्राला परळी येथे सोडण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. मित्राला परळीला रेल्वे स्टेशनला सोडून परत येत असताना अज्ञात वाहनाने परळी-बीड मार्गावर घाटसावळीजवळ रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांनाही अत्यवस्थ अवस्थेत बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अपघातात दुचाकीचा चुराडा झाला आहे.
अपघाताची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही बीड येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. परंतु, गंभीर जखमी झाल्यामुळे हाफेज आणि शाहेद यांचा रूग्णालयात पोहोचण्याआधीच मृ्त्यू झाला होता. रूग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी दोघांची तपासणी केली आणि मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर दोघांच्याही नातेवाईकांनी आणि मित्रांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली होती. दुचाकीला धडक देऊन पसार झालेल्या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Beed: बीड जिल्ह्यात आणखी एक इनामी जमीन घोटाळा, दिंद्रुड पोलीस स्टेशन मध्ये 10 जणांविरूद्ध गुन्हे
-
Beed News : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आमदारांची लक्षवेधी
-
Beed: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल; आरोप खोटे असल्याचा जिल्हाध्यक्षांचा दावा