एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मनोज म्हात्रे हत्या प्रकरण : दोन्हीही मारेकऱ्यांना अटक
भिवंडी : भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी दोन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली आहे. महेश पंडित म्हात्रे आणि मयूर प्रकाश म्हात्रे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
मनोज म्हात्रे हे भिवंडीतील अंजूरफाटा परिसरात राहत होते. काही कामानिमित्त ते त्यांच्या इमारतीखाली आले असताना दोघांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. एकाने म्हात्रेंवर गोळ्या झाडल्या, तर दुसऱ्याने कोयत्याने वार केले.
जखमी अवस्थेतच त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. म्हात्रेंवर हल्ला केल्यानंतर दोन्हीही हल्लेखोर फरार झाले होते. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता, अखेर पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. काही दिवसांपूर्वीही मनोज म्हात्रेंवर भिवंडीमधील नारपोली भागात हल्ला करण्यात आला होता.
दरम्यान म्हात्रेंची हत्या राजकीय वैमनस्यातून नव्हे, तर कौटुंबिक कारणातूनच झाल्याचं समोर आलं आहे. त्यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातून झाली असावी, असा अंदाज लावला जात होता.
संबंधित बातम्या :
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी चुलतभावावर गुन्हा
भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची गोळ्या झाडून हत्या
भिवंडीतील काँग्रेस नेते मनोज म्हात्रेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement