एक्स्प्लोर
VIDEO: चालकाला फाजील अात्मविश्वास नडला, नदी पात्रात ट्रक वाहून गेला

बेळगाव: बेळगावात मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला आलेल्या पुरात एक ट्रक वाहून गेला. काल संध्याकाळी ही घटना घडली. हा ट्रक हुबळीहून बागलकोटकडे निघाला होता. पावसामुळे नदीला चांगलाच पूर आला होता. त्यामुळे या पुरातून चालकानं गाडी पुलावरुन नेऊ नये असा सल्लाही देण्यात आला होता. गावकऱ्यांकडून त्याला वारंवार बजावण्यात आलं होतं. मात्र, पाण्यातून गाडी सहज पूल ओलांडेल. असा समज असलेल्या चालकानं ट्रक पाण्यात नेला. मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यानं ट्रक काही क्षणातच पाण्यात गेला. या दुर्घटनेत चालक मात्र सुखरुप बचावला आहे. VIDEO:
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
राजकारण
विश्व























