एक्स्प्लोर
पनवेलजवळ प्रबळगडाच्या डोंगरात तरुणीचा मृतदेह सापडला
नवी मुंबई : पनवेलनजीक असणाऱ्या प्रबळगडाच्या डोंगरात एका ट्रेकर तरुणीचा मृतदेह सापडला आहे. रचिता गुप्ता कनोडिया असं मृत तरुणीचं नाव असून ती मूळची हैदराबादची आहे.
27 वर्षीय रचिता गुप्ता कनोडिया 25 नोव्हेंबरला प्रबळगडावर एकटीच ट्रेकिंगला गेली होती. मात्र त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. प्रबळगडाच्या डोंगरात आज रचिताचा मृतदेह आढळल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली आहे.
रचिता गुप्ता कोनडिया प्रबळगडावरुन 600 मीटर खोल दरीत कोसळली आणि तिचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पण तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं गूढ उकलण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
नवऱ्याला शेवटचं लोकेशन पाठवलं
प्रोफेशनल ट्रेकल असेलल्या रचिताचं पाच वर्षांपूर्वी बिझनेसमन अमित कोनडियासोबत लग्न झालं होतं. 25 नोव्हेंबर रोजी ती पनवेलमध्ये पोहोचली. परंतु ट्रेकिंगला सुरुवात करण्याआधी तिने अमितला व्हॉट्सअॅपवर तिचं लोकेशन पाठवलं होतं.
परंतु 29 नोव्हेंबरनंतरही रचिता घरी न परतल्याने कुटुंबीय आणि मित्र-परिवाराने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. लास्ट लोकेशनच्या आधारावर ते हैदराबाद पोलिसांसह पनवेलला पोहोचले. पनवेल पोलिसांच्या मदतीने त्यांनी रचिताला शोधण्यास सुरुवात केली.
कुटुंबीय, पोलिस आणि गावकरी आणि पनवलेच्या निसर्ग मित्र या ट्रेक टीमच्या 10 ट्रेकर्सच्या मदतीने काल पुन्हा रचिताचा शोध सुरु झाला.
रचिताचा मृतदेह सापडला!
अखेर मंगळवारी दुपारी तीन वाजता प्रबळगडाच्या डोंगरात तिचा मृतदेह सापडला. तिच्याजवळील वस्तूंच्या आधारावर रचिताची ओळख पटवण्यात आली.
600 मीटर उंचीवरुन कोसळून तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तिचा मृतदेह सुजलेल्या अवस्थेत सापडला. चार दिवसांपासून मृतदेह तिथेच असावा. आम्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो कुटुंबीयांना सुपूर्द केला जाईल, असं पनवेल तालुक्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement