एक्स्प्लोर
वाहतूक पोलिसाच्या अंगावर कंटेनर घातला, शिसोदेंचा जागीच मृत्यू
वाहनांची तपासणी करताना समोरुन येणाऱ्या कंटेनरला अनिल शिसोदेंनी समोर उभं राहून अडवलं, मात्र कंटेनर चालकाने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला.
जळगाव : जळगावात कंटेनर चालकाने अंगावर गाडी घातल्यामुळे वाहतूक पोलिसाला जीव गमवावा लागला. चाळीसगाव- औरंगाबाद रोडवर घडलेल्या घटनेत महामार्ग पोलिस कर्मचारी अनिल शिसोदे यांचा मृत्यू झाला.
वाहतूक हवालदार अनिल शिसोदे आपल्या सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे चाळीसगाव-औरंगाबाद रोडवर गस्तीवर होते. वाहनांची तपासणी करताना समोरुन येणाऱ्या कंटेनरला त्यांनी समोर उभं राहून अडवलं, मात्र कंटेनर चालकाने न थांबता पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या सर्व प्रकारात अनिल शिसोदे यांना कंटेनरचा जोरदार धक्का लागला आणि ते खाली कोसळले. यामध्ये शिसोदेंचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
या घटनेनंतर आरोपी चालक कंटेनरसह पळ काढण्याचा तयारीत होता, मात्र पोलिसांनी त्याला कंटेनरसह ताब्यात घेतलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement