Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 13 जुलै 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढल्यास वेगळं चित्र दिसेल, शरद पवारांच्या वक्तव्याची राजकीय गोटात जोरदार चर्चा, एक-दोन बंडखोर सोडले तर इतरांचा विजय अशक्य, पवारांचं भाकीत
2. कोर्टाच्या निर्णयानंतर इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये, शिवसेनेचं राज्यपालांना पत्र, शिंदे गटाचे मनसुबे धुळीस मिळणार, साळवींना लिहिलेल्या पत्रात ठाकरेंचा निर्धार
3. गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आणि ठाण्यातील आनंद आश्रमाला भेट देणार, तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिकही गर्दी करणार
4. पुण्यातील खडकवासलातून विसर्ग वाढवला, गोदावरीतील पूरस्थिती कायम, मुंबईतल्या धरण साठ्यात मोठी वाढ, आज महाराष्ट्रभर पावसाचा जोर कायम राहणार
5. आजपासून पुढील सहा दिवस समुद्राला उधाण, किनाऱ्यांवर साडेचार मीटर्स उंचीपर्यंतच्या लाटा उसळणार, सावधगिरीचा इशारा
Maharashtra Rain Updates : राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. आताच्या माहितीनुसार ताज्या रडार आणि सॅटेलाइट ऑब्सनुसार, मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघरच्या काही भागात पुढील 2.3 तास मध्यम तीव्रतेचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
6. सरकारी सेवेतील डॉक्टरांना खासगी सेवा देता येणार, उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, 10 वर्षांपूर्वीच्या अध्यादेशाला स्थगिती
7. सीएनजी प्रतिकिलो 4 रुपयांनी महागल्यानं दर 80 रुपयांवर, तर पीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 3 रुपयांची वाढ, महागाईचा दर 7 टक्क्यांवर
8. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा मुख्य दिवस, साईनगरी भक्तांनी गजबजली, तर गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावातही गर्दी
9. ओव्हलच्या मैदानावर भारताचा ऐतिहासिक विजय, 48 वर्षात पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात 10 विकेट्सनं धुव्वा, 6 विकेट घेणारा बुमरा विजयाचा शिल्पकार
10. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंचं देशातून पलायन, पत्नी आणि 2 सुरक्षारक्षकांसह मालदीवला गेल्याची माहिती