एक्स्प्लोर
कोल्हापूरमध्ये टोल कर्मचाऱ्यांची वाहन चालकाला मारहाण, चालक गंभीर
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाक्यावर ट्रक चालकाने टोल दिला नाही म्हणून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे. गेले तीन दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
शिराळा तालुक्यातील संजय भीमराव कडवेकर हे ट्रक चालक पुणे-बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाक्यावरुन शनिवारी ट्रक घेऊन कोल्हापूरकडे निघाले होते. टोलनाक्यावर टोल न भरता ते कोल्हापूरकडे गेले. टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी ट्रकचा पाठलाग करुन चालकाला पकडले आणि टोल नाक्याच्या कार्यालयात आणून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये संजय गंभीर जखमी झाले. त्यानंतर संजय यांच्याच मोबाईलवरुन त्यांच्या भावाला फोन करुन त्यांना नेण्यास सांगितलं.
संजय यांचे भाऊ पोपट कवडेकर यांनी त्यांना अॅम्बुलन्सने कोल्हापूरला आणून खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. संजय यांच्या गुप्तांगावर जबर मार बसल्याने ते अत्यवस्थ आहेत. शंभर रुपयांचा टोल त्यांच्या जीवावर बेतला आहे.
याप्रकरणाची वाहतूक संघटनांनी दखल घेतली आहे. टोल नाक्यांवरील मुजोरी बंद व्हावी, अशी मागणी होते आहे. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात किणी टोल नाक्यावरील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप कुणालीही अटक करण्यात आलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement