एक्स्प्लोर
मुंबईतील तीन तरुण साताऱ्यातील मेणवलीत बुडाले, एकाचा मृत्यू
सातारा: साताऱ्यातील मेणवली येथील नदीपात्रात मुंबईतील तीन तरुण बुडाल्याची प्राथमिक माहिती नुकतीच समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोघांवर सध्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं समजतं आहे.
बुडालेले तीन तरुण हे मुंबईतून आपल्या नातेवाईकांसह आले होते. त्यांचे नातेवाईक हे पाचगणीत थांबले होते. तर हे तिघेही मेणवली येथे आले. या परिसरात बऱ्याचदा सिनेमांचं शुटींग होतं. त्यामुळे हे ठिकाण पाहण्यासाठी हे तरुण आले होते. त्यावेळी याच परिसरात असणाऱ्या नदीपात्रात हे तिघेही पोहण्यासाठी उतरले होते. त्यावेळी एक जण बुडत होता तेव्हा त्याला वाचवण्यासाठी दोघेही तरुण गेले. तेव्हा हे तिघेही नदीपात्रात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ ट्रेकर्सकडून तिघांचा शोध सुरु झाला. या तिघांनाही बाहेर काढण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण यातील एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मात्र, दोघांबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत असत हे तरुण मुंबईतील नेमकी कोणत्या भागातून आले होते याबाबत अद्याप काहीही माहिती समजू शकलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement