एक्स्प्लोर

नागपूरमध्ये एका रात्रीत तीन हत्या, पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

सामान्य भाजी विक्रेता, एक तरुण आणि एका व्यापाऱ्याची गुडांनी हत्या केली आहे. एकाच रात्री अवघ्या चार तासात घडलेल्या या घटनांमुळे नागपुरात खळबळ माजली आहे.

नागपूर : नागपूरमध्ये बुधवारी रात्री वेगवेगळ्या भागात गुन्हेगारांनी शहरात कायद्याचे राज्य नसून जंगलराज असल्याचे चित्र निर्माण केलं. अवघ्या चार तासांच्या कालावधीत नागपूरच्या तीन वेगवेगळ्या भागात तिघांची हत्या झाली. त्यामध्ये एक सामन्य भाजी विक्रेता, एक तरुण आणि एका व्यापाऱ्याचा समावेश आहे. पोलिसांनी तिन्ही घटनांचा तपास सुरु केला असून काही संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

पहिली घटना नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत हसनबाग रोडवर घडली. भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे मोहम्मद आसिफ शेख यांच्या ठेल्यावरुन काही गुंडांनी भाजी खरेदी केली, मात्र पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी भाजी विक्रता आसिफ आणि त्याचा मित्र इमरान सय्यद नियाज याने भाजीचे पैसे मागितले. मात्र गुंडांनी पैसे देण्यास नकार देत उलट दोघांना मारहाण केली. त्यानंतर गुडांनी चाकूने भोसकून इम्रानची हत्या केली, तर आसिफ शेखला गंभीर जखमी केले. दुसरी घटना नंदनवन पोलीस स्टेशनअंतर्गत सेनापती नगरच्या मैदानात घडली. याठिकाणी विकी डहाके नावाच्या तरुणाची अज्ञात हल्लेखोरांनी धारधार शस्त्रांने भोसकून हत्या केली. या घटनेचं कारण अद्याप समजलं नाही. मात्र पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

तिसरी घटना बैरामजी टाऊन परिसरातील गोंडवाना चौकात घडली. कुलरचा व्यवसाय करणाऱ्या ऋषी खोसला यांची हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून हत्या केली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋषी खोसला कारने घराकडे जात असताना काही हल्लेखोरांनी कार अडवत ऋषी यांना गाडीबाहेर ओढून काढले. त्यानंतर त्यांची धारधार शस्त्राने हत्या केली.

एकाच रात्री अवघ्या चार तासात घडलेल्या या घटनांमुळे नागपुरात खळबळ माजली आहे. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासन हल्लेखोरांना पकडण्यासाठी कामाला लागलं आहे. मात्र अशा घटनांमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं झालं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

VIDEO | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahatma Gandhi:महात्मा गांधींचं पुण्याशी काय आहे कनेक्शन?'एबीपी माझा'चा विशेष रिपोर्टABP Majha Headlines : 3 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda's Misfire Incident : रिव्हॉल्वरचा ट्रिगर गोविंदाने दाबल्याचा पोलिसांना संशय #abpमाझाAjit Pawar on Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना बोनस नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Iran vs Israel : इराणनं 200 क्षेपणास्त्रांचा मारा केला, इस्त्रायलकडून व्हिडीओ शेअर करत मनसुबे जाहीर, जगाचं टेन्शन वाढणार
इस्त्रायलनं व्हिडीओ शेअर केला, इराणमध्ये हल्ला कुठं करणार याचे संकेत दिले, जगाचं टेन्शन वाढणार
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
मुंबईकरांनो काळजी घ्या, डेंग्यू,मलेरियाचे रुग्ण वाढले ; सप्टेंबर महिन्यात 1261 रुग्णांची नोंद
Embed widget