एक्स्प्लोर
पोलिसांच्या मुलांसाठी ‘नोकरी सेंटर’, ठाणे पोलिसांचा उपक्रम
ठाणे : शैक्षणिक योग्यता असतानाही अनेक कंपन्यात नोकरीसाठी मुलाखत देऊन रिकाम्या हाताने घरी परतणाऱ्या मुलांमध्ये नैराश्येचे वातावरण असते. या नैराश्येतून तरुणांना बाहेर काढण्यासाठी ठाणे पोलिसांच्या कल्याणकारी उपक्रमात पोलिसांच्या मुलांना त्वरित नोकरी मिळवून देण्यासाठी ‘नोकरी सेंटर’ सुरु करण्यात आले आहे.
दिवसरात्र जनतेच्या संरक्षणासाठी घराबाहेर असलेल्या पोलिसांच्या पोरांना नोकरी अभावी नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी पोलीस संघटनेने ‘नोकरी सेंटर’चा दिलासा दिला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्तरित्या उपक्रम राबविण्यात येत आहे.
ठाणे, मुंबई, नवी मुंबई परिसरातील 50 कंपन्यामधून पोलिसांच्या मुलांना 8 वी पास ते आयटीआय धारक, पदवी, अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए अशा उच्चशिक्षित मुलांना हमखास नोकरी मिळवून देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
या नव्या उपक्रमाने आता पोलिसांच्या शिकलेल्या आणि बेरोजगार मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. यावेळी पोलिस दलातील काम करणाऱ्या पोलिस कुटुंबीय देखील हजर होते. या उपक्रमाचे त्यांनी देखील स्वागत केले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement