एक्स्प्लोर
दहावीच्या परीक्षांना सुरुवात, पेपरफुटी टाळण्यासाठी सतर्कता

पुणे : राज्यात आजपासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच एसएससीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. 1 एप्रिलपर्यंत बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा चालणार आहेत. शैक्षणिक वाटचाल ठरवण्याच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा महत्त्वाच्या मानल्या जातात. राज्यभरातून सुमारे 17 लाख 66 हजार विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत. चार हजारांहून जास्त केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीचे पेपर सुरु होण्याच्या काही काळ आधीच सोशल मीडियावर फुटत होते. हे प्रकार टाळण्याचं आवाहन बोर्डासमोर असणार आहे. यासाठी शिक्षण मंडळाकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येणार आहे. पेपरफुटीविषयी सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांनी कुठलाही ताण न घेता परीक्षांना सामोरं जावं आणि यशस्वी व्हावं यासाठी 'एबीपी माझा'कडून परीक्षार्थी आणि पालकांना शुभेच्छा!
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
ठाणे
निवडणूक
निवडणूक























