राज्यभरात थंडीचा कडाका वाढला, निफाडचा पारा 1.8 अंशावर
मुंबईतं काल कुलाब्यात 20.5 अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली पाहायला मिळत आहे. सांताक्रूजमध्ये आज 12.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
मुंबई : मुंबईसह राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबईत आज 12.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे मुंबईत काही ठिकाणी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घट झाली आहे.
मुंबईतं काल कुलाब्यात 20.5 अंश सेल्सिअस, सांताक्रूजमध्ये 17.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यात आज 5 अंश सेल्सिअसपर्यंत घट झालेली पाहायला मिळत आहे. सांताक्रूजमध्ये आज 12.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली.
निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद
निफाडचा पारा 1.8 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. यंदाच्या वर्षात राज्यातील हे सर्वात निच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. सातारा, महाबळेश्वरमध्येही कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं पुढील 2 ते 3 दिवस तापमानात आणखी घट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यातील शहरांमधील तापमान
निफाड- 1.8 अंश सेल्सिअस नाशिक- 5.7 अंश सेल्सिअस सातारा - 13 अंश सेल्सिअस महाबळेश्वर - 12 अंश सेल्सिअस सांगली- 18 अंश सेल्सिअस अहमदनगर -12 अंश सेल्सिअस पालघर -16 अंश सेल्सिअस परभणी -11.3 अंश सेल्सिअस धुळे - 9.2 अंश सेल्सिअस जळगाव - 8.4 अंश सेल्सिअस नंदुरबार- 9 अंश सेल्सिअस अकोला- 11.2 अंश सेल्सिअस