तलाठी भरतीच्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी! पेपरची वेळ बदलली, दुपारच्या सत्रातील परीक्षा दीड तास उशिराने होणार सुरू
दुपारी साडेबारा वाजता सुरू होणारी परीक्षा आता दोन वाजता सुरू होणार आहे. तशी सूचना सर्व परीक्षा केंद्रांबाहेर लावण्यात आलीय.
मुंबई : राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षेतील (Talathi Bharti) सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा उशिराने सुरू झालीय. त्यामुळे पुढील दोन सत्रातील परीक्षाही दीड तास उशिराने सुरू होतील, अशी माहिती जमाबंदी आयुक्त अनिल रायते यांनी दिलीय. दुपारी साडेबारा वाजता सुरू होणारी परीक्षा आता दोन वाजता सुरू होणार आहे. तशी सूचना सर्व परीक्षा केंद्रांबाहेर लावण्यात आलीय.
पेपर उशीर झाल्याने दुपारचं वेळापत्रक कोलमडले
राज्यात तलाठी भरतीसाठी परीक्षा सुरू आहेत आणि या परीक्षेत आज सर्व्हरचं विघ्न उभं राहिलं होतं. सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील नागपूरसह अकोला, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी अनेक परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ झाला.सकाळी 9 वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र, सर्व्हर डाऊन मुळे विद्यार्थ्यांना 10 वाजता परीक्षा केंद्रात सोडण्यात आले त्यानंतर 10.30 वाजता परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर उशीर झाल्याने दुपारचं वेळापत्रक कोलमडले आहे.
गेले चार दिवस राज्यात तलाठी पदासाठीची ऑनलाईन परीक्षा सुरू आहे.रोज परीक्षा ही तीन सत्रांमध्ये घेतली जाते. पहिले सत्र सकाळी 9 ते 11, दुसरे सत्र दुपारी 12.30 ते 2.30 आणि तिसरे सत्र सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत होते. ऑनलाइन परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नपत्रिका परीक्षार्थींना सोडवावी लागते. राज्यभरात 17 लाखापेक्षा जास्त परीक्षार्थी यंदा तलाठी पदासाठीच्या परीक्षेसाठी बसलेले आहे. त्यामुळे ही परीक्षा राज्यभरातील विविध केंद्रांवर अनेक दिवस घ्यावी लागत आहे.
आज सकाळी ऑनलाइन परीक्षेसाठीचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे पहिल्या सत्राची परीक्षा वेळेत सुरू झाली नाही. सकाळी 9. 40 वाजता जवळपास सर्व्हर सुरू झाल्याची माहिती आहे. सर्व परीक्षार्थी बसल्यानंतर मुंबईतून टीसीएसकडून सर्व संगणकांवर एकाच वेळी प्रश्नपत्रिका दिली जाते आणि तिथून दोन तास मोजले जातात नागपुरातील सर्व केंद्रांवर पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना ज्या वेळेस त्यांचा पेपर सुरू होईल तेव्हापासून पूर्ण दोन तासाचा कालावधी दिला जाईल असे सांगितले गेले.
सकाळी परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने उमेदवार प्रवेश पत्र हातात घेऊन उभे होते पण त्यांना वर्गात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे उमेदवार संतप्त झालेत. या आधी नाशिकमध्ये तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे य़ापुढे तरी तलाठी परीक्षा निर्विघ्नपणे पार पडतील, का, असा प्रश्न तलाठी पदाचे परीक्षार्थी विचारत आहेत. दरम्यान, आता सर्व्हर पूर्ववत झाला आहे.
हे ही वाचा :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI