एक्स्प्लोर
शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा करा, खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना
दोन दिवसांच्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागेल का असा प्रश्न पडतो. पाच दिवसांच्या आठवड्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा आणि या संदर्भात तज्ज्ञांचे मत विचारात घ्यावे.
![शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा करा, खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना Take five days a week to school says Supriya Sule शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा करा, खासदार सुप्रिया सुळे यांची सूचना](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/27234938/supriya.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा राज्य मंत्रीमंडळाने आज जाहीर केला त्याच धर्तीवर राज्यातील शाळांनादेखील पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी विविध शिक्षक संघटना करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शाळांना पाच दिवसांचा आठवडा असावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये एका कार्यक्रमात जिल्हा परिषदेला प्रस्ताव तयार करून शिक्षण विभागाकडे पाठवावा अशा सूचना दिल्या आहेत.
सुप्रिया सुळे म्हणाले, शासकीय कार्यालयाप्रमाणे शाळांना देखील पाच दिवसांचा आठवडा असावा असे केल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रवासाचा खर्च वाचेल, इंधनाची बचत होईल, पाच दिवसांचा आठवडा, हा नियम सीबीएससी बोर्डाला लागू आहे.
परंतु पाच दिवसांच्या प्राथमिक शाळेच्या आठवणी या संदर्भात शिक्षकांची नकारात्मक भूमिका दिसून येत आहे. अशा निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही. तसेच आरटीआय कायद्यानुसार शिक्षकांना आठवड्याचे 48 तास अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागतात. तर पाच दिवसांचा आठवडा केल्यामुळे उरलेले आठ तास कसे पूर्ण करायचे असा प्रश्न शिक्षकांना पडतो. विद्यार्थ्यांना दिलेला अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही.
5 Days Week For Schools | शाळांनाही पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा; खासदार सुप्रीया सुळे यांची सूचना
दोन दिवसांच्या सुट्टीमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागेल का असा प्रश्न पडतो. पाच दिवसांच्या आठवड्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करावा आणि या संदर्भात तज्ज्ञांचे मत विचारात घ्यावे. सीबीएससी पेक्षा प्राथमिक शाळांचा अभ्यासक्रम मोठा असल्यामुळे तो पूर्ण होत नाही. तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना अधिकचे तास द्यावे लागतात.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केला आहे. त्याच धर्तीवर राज्यातील सर्व शाळा, ज्युनियर कॉलेज व सीनियर कॉलेज यांनाही पाच दिवसांचा आठवडा करावा, अशी मागणी करणारे पत्र आमदार कपील पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठवले आहे.
संबंधित बातम्या :
दोन दिवसही व्यवस्थित काम न करणाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सवाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
अहमदनगर
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)